लालसी सरकारने आमच्या माता-भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 11:17 IST2020-02-09T11:13:36+5:302020-02-09T11:17:22+5:30

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का नाही? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Chandrakant Patil criticizes Thackeray government over women oppression | लालसी सरकारने आमच्या माता-भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली : चंद्रकांत पाटील

लालसी सरकारने आमच्या माता-भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली : चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात सातत्याने महिला अत्याचारांच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे विरोधक या मुद्यावरून सरकारवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महिला अत्याचारांच्या घटनेवरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पाटील यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न होतो. औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये एका महिलेला जिवंत जाळलं जातं. पनवेलमध्येही असाच प्रकार घडतो. पुण्यातही सिनेअभिनेत्री मानसी नाईकची छेड काढली जाते. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

तर, सत्ता लालसी सरकारने आज आमच्या माता-भगिनींची सुरक्षा अक्षरशः वार्‍यावर सोडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित नाहीत हे किती मोठे दुर्दैव असल्याचे सुद्धा पाटील म्हणाले.

 

 

 

Web Title: Chandrakant Patil criticizes Thackeray government over women oppression