शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

Chandrakant Patil : "ठाकरे सरकारकडून सत्तेचा गैरवापर, नारायण राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:41 IST

"नारायण राणे यांना नोटीस पाठवणे हा हस्यास्पद प्रकार. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं, अशीच परंपरा सुरु झाली आहे.”

मुंबई - शिवसैनिकावरील हल्ला प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. यासंदर्भात एका पत्रकार परिषदेदरम्यान, नितेश राणे नेमके कुठे आहेत? असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एका पत्रकाराने विचारला होता. यावर राणे भडकले होते आणि हे सांगायला मला काय मुर्ख समजलात का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होते. यानंतर कणकवली पोलिसांनी त्यांना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यासंपूर्ण प्रकरणावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाष्य केले आहे. “राणे सर्वांना पुरून उरणारे आहेत,' असे पाटील यांनी म्हटले आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, "राणे या सर्वांना पुरून उरणारे आहेत. बराच काळ हे कुणी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या स्टेरमेंटवर बोलण्याचे, प्रतिक्रिया देण्याचे धाडसही करत नव्हते. आता जरा त्यांनी कलेक्टिव्हली धाडस गोळा केले आहे. आणि सत्ता आहे अन् त्या सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. पण ते या सर्वांना पुरूण उरणारे आहेत. काही काळजी करू नका."

यावेळी पाटील यांनी विद्यापीठ सुधारणा कायद्यावरही भाष्य केले. विद्यापीठ सुधारणा कायदा ज्याप्रकारे समंत करून घेतला गेला, ते नियमांना धरून नव्हते. नारायण राणे यांना नोटीस पाठवणे हा हस्यास्पद प्रकार आहे. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं, अशीच परंपरा सुरु झाली आहे,” असेही पाटील यांनी म्हटले आहे. 

सध्या कामात व्यस्त, व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जबाब नोंदविण्यास तयार - राणेयासंदर्भात कणकवली पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्राद्वारेच उत्तर दिले आहे. "मी केंद्रीय मंत्री असून  पुढील दोन, तीन दिवस कामात व्यस्त आहे. यामुळे आवश्यकता असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बजावण्यात आलेल्या नोटिशीसंदर्भात मी जबाब नोंदवण्यास तयार आहे. मी व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही. अशा आशयाचे पत्र कणकवली पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे