बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या साधनेने रौद्ररूप धारण केले असून मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला असून नदीने रौद्र रूप धारण केले आहे. यामुळे पाच ते सहा गावातील सुमारे दहा हजार हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे कोट्यवधी रुपयांचे बसून नुकसान झाले.
बालाघाटच्या डोंगररांगातून वाहत असलेल्या या नदीला बार्शी तालुक्यासह भुम,वाशी आणि कळंब तालुक्यात पडलेल्या पावसामुळे मोठे पाणी येते. यावर्षी तालुक्यात सरासरी दोनशे टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.आणि आणखीन ही पाऊस पडतच आहे. त्यामुळे या पट्ट्यात असलेल्या कळंब तालुक्यातील बांगरवाडी तसेच बार्शी तालुक्यातील चारे वालव, काटेगाव, आणि कळंबवाडी हे लघु प्रकल्प तर बाभूळगाव हा बृहत लघु प्रकल्प मागील महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरला आहे. याच परिसरातील पाझर तलाव ही भरलेले आहेत.
नदी 20 मे पासून दुथडी भरून वाहत आहे. शनिवार,रविवार सोमवार आणि मंगळवार या चार दिवसात तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात पाऊस झाल्याने मंगळवारी मध्यरात्री नदीला मोठा महापूर आला त्यामुळे नदीवरील बेलगाव,आगळगाव, धस पिपळगाव नवीन पूल, देवगाव, कंदलगाव,शिरसाव,वाकडी हे पूल तर पाण्याखाली गेलेच पण महापुरामुळे नदीपात्रातून पाणी बाहेर येऊन आगळगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, देवगाव,धस पिंपळगाव आणि शेवटी असलेल्या कांदलगाव मधील सोयाबीन, उडीद, मका ,कांदा, ऊस या पिकामधूनपाच ते सात फूट पाणी वाहत आहे. या पुराच्या पाण्याने नरसिंह मंदिराला देखील वेडा घातला असून गावातील अनेक घरासह अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये देखील पाणी शिरले आहे.
चांदणी सोबतच सिरसाव ता परांडा येथील नदीलाहीअसाच मोठा पूर आलेला आहे या दोन नद्यांचा हिंगणगाव येथे संगम होत असल्याने पाण्याला पुढे वाट मिळत नाही. यापूर्वी चांदणी धरण देखील शंभर टक्के भरले आहे चांदणी नदीचे तसेच परंडा तालुक्यातील येणाऱ्या बाणगंगा नदीचे ही पाणी परंडा तालुक्यात वडणेर देवगाव मार्गे या नद्या लव्हे लोहारा सीना नदीला मिळतात.सिनेला महापूर असल्याने या नदीचे पाणी मिसळण्यासही अडथळा निर्माण होत असून त्यामुळे पाणी लवकर कमी होण्याची शक्यता नसल्याचे सरपंच प्रदीप नवले यांनी सांगितले.