पुढील ४-५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 09:14 AM2021-10-06T09:14:40+5:302021-10-06T09:14:54+5:30

मान्सून राजस्थानातून परतीच्या वाटेवर, बुधवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे

Chance of torrential rains in Konkan, Central Maharashtra for next 4-5 days; Yellow alert issued | पुढील ४-५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी

पुढील ४-५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी

Next

मुंबई : मुंबई, राज्य आणि देशभरात ठिकठिकाणी धिंगाणा घालणारा मान्सून आजपासून परतीच्या वाटेला लागण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानेच हा अंदाज वर्तविला असून, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल वातावरण आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. परतीचा पाऊस राजस्थानातून सुरू होईल.

बुधवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांत ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद यांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर आकाश मोकळे असताना रात्री अचानक हवामानात बदल झाला; आणि मुंबईत ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने काही काळ हजेरी लावल्याचे चित्र होते.

७ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर ८ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ९ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल.

पुढील चार ते पाच दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. असे वातावरण दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री निर्माण होईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी. - कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामान शास्त्र विभाग

Read in English

Web Title: Chance of torrential rains in Konkan, Central Maharashtra for next 4-5 days; Yellow alert issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस