कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घ्या; मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 15:10 IST2021-05-29T15:09:20+5:302021-05-29T15:10:57+5:30
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घ्या; मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उदघटनावेळी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरोना संदर्भातील उपचार पद्धतींवर भाष्य केलं. "राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या आणि पावसाला येतोय तर याकाळात सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावरील उपचारांबाबत आता औषधांचा अतिवापर देखील घातक ठरत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे औषधांचा अनाठायी वापर आपण टाळायला हवा", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोनाचा आजार अंगावर काढू नका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोरोना आजाराबाबत आता अधिक सतर्क राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे असं सांगताना कोरोनाचा अंगावर अजिबात काढू नका असं आवाहन केलं आहे. "कोरोना हा आजार अजिबात अंगावर काढू नका. हा आजार इतर आजारांसारखा नाही. वेळीच उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतंही औषध घेऊ नका", असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन - LIVE https://t.co/LUqpUbu1ja
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 29, 2021
बुरशीजन्य आजारांवर उपचारपद्धती निश्चित करा
राज्यात आता कोरोनानंतर बुरशीजन्य रोगाचा प्रसार वाढतो आहे. यामागे औषधांचा अतिवापर हे महत्वाचं कारण असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असं व्हायला नको. बुरशीजन्य आजारांवर देखील आता उपचारपद्धती निश्चित व्हायला हवी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.