शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोजागिरीला गडगडाटासह पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 20:57 IST

कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस

ठळक मुद्देगेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील सुधागड पाली, जव्हार, माणगाव, वाडा येथे हलका पाऊस कोकण, गोव्यात तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या आणखी काही भागातून तर पश्चिम बंगलाच्या काही भागातून माघारी परतला आहे़. कोजागिरीला १३ ऑक्टोबरला कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील सुधागड पाली, जव्हार, माणगाव, वाडा येथे हलका पाऊस झाला़. मध्य महाराष्ट्रात जत, पाथर्डी ६०, नेवासा, शेवगाव ४०, कवठे महाकाळ, शाहूवाडी, श्रीरामपूर २०, अहमदनगर, बार्शी, महाबळेश्वर, वेल्हे १० मिमी पाऊस पडला़ मराठवाड्यात देगलूर, वाशी ४०, लातूर, मुदखेड २०, औरंगाबाद, धर्माबाद, हदगाव, कळमनुरी, लोहारा, मुखेड, उस्मानाबाद, रेणापूर, तुळजापूर १० मिमी पाऊस झाला़. विदर्भात जिवती २० व भद्रावती १० मिमी पाऊस झाला़ घाटमाथ्यावरील, कोयना ३०, अम्बोणे, शिरगाव, कोयना (नवजा) १० मिमी पाऊस पडला़. कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ़़़़़़़़़़१३ ऑक्टोबर रोजी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १४ ऑक्टोबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे़. १५ ऑक्टोबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल़ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. १६ ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ़़़़़़़़मुंबई व उपनगरात सायंकाळी अथवा रात्री आकाश अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. त्यामुळे कोजागिरीला मुंबईकरांना चंद्रदर्शन होणे अवघड राहण्याची शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान