शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 12:35 IST

मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़.

ठळक मुद्देमहाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताविदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र झाले असून ते पूर्व पश्चिमेच्या दिशेला स्थिर झाले आहे़. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या किनारपट्टी, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. त्यामुळे पुढील तीन दिवस गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़. गेल्या २४ तासांत फोंडत्त १२४, भोर ८६, पारनेर ८०, भिरा ७२, अहमदनगर ५८, दाभोलिम ४५, बीड ४०, गडचिरोली १९, परभणी २, पुणे ४२ मिमी पावसाची नोंद झाली होती़. हवामान विभागाने सोमवारी मतदानाच्या काळात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता़. पण सोमवारी सकाळनंतर बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती़. रात्री उशिरा पुणे, मुंबई तसेच सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली़. कोकण, गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला़. मंगळवारी दिवसभरात महाबळेश्वर ३१, औरंगाबाद १, अकोला ५, अमरावती, बुलडाणा १ मिमी पावसाची नोंद झाली होती़. इशारा : २३ ऑक्टोबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़. २४ ऑक्टोबरला कोकण, गोव्या तुरळक ठिकाणी जोदार पाऊस तर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २५ ऑक्टोबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोदार पा्वसाची शक्यता आहे़. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़. ..........पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ते २६ऑक्टोबर दरम्यान सोसाट्याचा वारा, मेघगर्जनासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी चार दिवस पाऊस राहील़ अहमदनगर, पुणे, कोल्हापूर व सोेलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़ .बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी २३ आॅक्टोबरला मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़.ऑ  तसेच ओरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरसह बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़. ...........

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्रgoaगोवा