सिगारेटसाठी नागपूरमध्ये चाकूहल्ला

By admin | Published: June 23, 2017 09:07 PM2017-06-23T21:07:13+5:302017-06-23T21:07:13+5:30

सिगारेटसाठी पैसे दिले नाही म्हणून तीन गुंडांनी मध्यप्रदेशातील एका व्यक्तीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले.

Chakahala in Nagpur for cigarette | सिगारेटसाठी नागपूरमध्ये चाकूहल्ला

सिगारेटसाठी नागपूरमध्ये चाकूहल्ला

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - सिगारेटसाठी पैसे दिले नाही म्हणून तीन गुंडांनी मध्यप्रदेशातील एका व्यक्तीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. गुरुवारी पहाटे 2.30 वाजता नागपूरच्या कस्तुरचंद पार्कजवळच्या एलआयसी चौकातील बसथांब्यावर ही घटना घडली. 
शिवनी जिल्ह्यातील गोरखपूर (अलेबिया) येथील देवीसिंग मक्कन उईके (वय ४१) हे रोजगाराच्या निमित्ताने  नागपुरात आले होते.
शेतीची कामे असल्याने गावाला परत जाण्यासाठी ते एलआयसी चौकातील बसथांब्यावर गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास बसची वाट बघत असताना त्यांच्याजवळ तीन गुंड आले. त्यातील एकाने उईके यांना  सिगारेट पिण्यासाठी पैसे मागितले. उईकेने नकार देताच या गुंडांनी त्यांच्या पोटात चाकूने भोसकून त्यांना गंभीर जखमी केले. त्याचवेळी एक आॅटोवाला आल्यामुळे आरोपी पळून गेले. आॅटोवाल्याने उईकेंना कामठीच्या रुग्णालयात नेऊन भरती केले. डॉक्टरांनी माहिती घेतल्यानंतर सदर पोलिसांना कळविले. त्यानंतर सदरचे पोलीस उपनिरीक्षक रोकडे यांनी उईकेंच्या पुतण्याशी संपर्क साधून त्याला बोलवून घेतले. त्याच्या मदतीने उईकेंना मेयोत दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी सायंकाळी सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.   
 

Web Title: Chakahala in Nagpur for cigarette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.