शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

उपसचिव मिलिंद शेणॉय यांना प्रमाणपत्र वाटप भोवले! सरकारकडून उचलबांगडी, आदेशात काय म्हटलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 09:22 IST

राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांना अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा प्रताप भोवला आहे. त्यांची बदली करण्यात आली असली, तरी पुढील जबाबदारी दिली गेली नाहीये. 

राज्यातील शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया ऑगस्ट २०२५ पासून स्थगित केली गेली होती. या खात्याचे तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतलेला होता. मात्र, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पुढील काही तासांमध्येच शैक्षणिक संस्थांना ७५ अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे दिली गेली. या प्रमाणपत्रांवर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची स्वाक्षरी होती. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला स्थगिती दिली. चौकशी करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर आता मिलिंद शेणॉय यांची अल्पसंख्यांक विभागातून हटवण्यात आले आहे. त्यांची बदली करण्यात आली असली, तरी पुढील पद नियुक्ती केली गेलेली नाही. 

अल्पसंख्यांक विभागाचे तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्यांक प्रमाणपत्र वाटला स्थगिती दिलेली होती. ऑगस्ट २०२५ पासून ही स्थगिती असताना २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवारांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव रुग्णालयात ठेवलेले असतानाच मंत्रालयातून शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र वाटप केली गेली होती. 

उपसचिव पदावरून उचलबांगडी

ज्या शैक्षणिक संस्थांना ७५ अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्रे दिली गेली होती. त्यावर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची डिजिटल स्वाक्षरी होती. त्यामुळे त्यांच्याकडून ही प्रमाणपत्रे वाटली गेल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत सरकारकडून त्यांची बदली करण्यात आली आहे. 

'महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५' मधील कलम ४ (४) आणि ४(५) नुसार मिलिंद शेणॉय यांची बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव शेणॉय यांची बदली करण्यात आल्याचेही आदेशात म्हटले आहे. 

पुढील नियुक्तीसाठी वाट बघावी लागणार

महत्त्वाचे म्हणजे मिलिंद शेणॉय यांची उपसचिव पदावरून उचलबांगडी करत असताना सरकारने त्यांची पुढील पद नियुक्ती केलेली नाही. बदलीनंतर पुढील पदस्थापनेची त्यांनी प्रतिक्षा करावी, असे आदेशात स्पष्ट केले गेले आहे. 

अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्रे वाटप केल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. अधिकाऱ्यांनी एका-एका प्रमाणपत्रासाठी २५ लाख रुपये घेतले असल्याचे कळत आहे, असा दावा केला. 

शाळांना अल्पसंख्यांक दर्जा का हवा असतो?

अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या शाळांना आरटीई (शिक्षण हक्क कायदा) लागू होत नाही. शिक्षण हक्क कायदा लागू होत नसल्याने २५ टक्के गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे बंधन नसते. अल्पसंख्यांक शाळातील शिक्षकांना टीईटी परीक्षेची अट नसते. त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेमध्ये सवलत मिळते. त्याचबरोबर सरकारकडून वेगवेगळ्या कोट्यातून कोट्यवधि रुपयांचे अनुदान व देणगी घेण्यासही मूभा असते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Certificate Distribution Costs Deputy Secretary His Job; Transferred Immediately

Web Summary : Deputy Secretary Milind Shenoy transferred after unauthorized minority certificates issued after minister's death. Government orders inquiry. Allegations of corruption surface regarding certificate distribution. Schools seek minority status for RTE exemptions and financial benefits.
टॅग्स :Mantralayaमंत्रालयTransferबदलीEducationशिक्षणSchoolशाळा