शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरिता सीईओ नेमणार

By admin | Updated: November 8, 2014 04:03 IST

मुंबई शहराच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्याकरिता अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी नियुक्त करून मुंबईशी संबंधित सर्व एजन्सींच्या कारभारावर देखरेख करण्याचे अधिकार

मुंबई : मुंबई शहराच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्याकरिता अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी नियुक्त करून मुंबईशी संबंधित सर्व एजन्सींच्या कारभारावर देखरेख करण्याचे अधिकार त्यांना देण्यात येतील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे यांनी हा मुंबई स्वतंत्र करण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. एकेकाळी भाजपाच्या वर्तुळात ऊठबस असलेल्या सुधींद्र कुळकर्णी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरिता सीईओ असावा, अशी भूमिका मांडली होती. नेमकी त्याच भूमिकेची री फडणवीस यांनी ओढली. सध्या महापालिका, एमएमआरडीए, म्हाडा, जिल्हाधिकारी अशा विविध एजन्सीज मुंबईच्या विकासाचे निर्णय घेतात. त्यांच्यामध्ये समन्वय नसल्याने ही जबाबदारी त्या अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असतील. हा अधिकारी राज्याच्या मुख्य सचिवांना बांधील असेल, असे फडणवीस यांचे मत आहे.शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांची ही भूमिका म्हणजे मुंबई शहराचे व्यवस्थापन करण्यातील अपयशाची कबुली असल्याचे मत व्यक्त केले. हे मुंबई वेगळे करण्याचे कारस्थान असल्याचे ते म्हणाले.सुधींद्र कुळकर्णी यांनी शिवसेनेचा विरोध अप्रस्तुत असून, आपली भूमिका ही शहर व्यवस्थापनासंबंधी मर्यादित होती. कुणीही मुंबई शहर स्वतंत्र करू शकत नाही, असे मत व्यक्त केले. मुंबईत वेगवेगळ्या एजन्सी नागरी सुविधा पुरवत असल्याने गोंधळात भर पडत असल्याने त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा मांडली असताना अचानक राहुल शेवाळे यांनी कशी घेतली, असा सवाल भाजपाकडून केला जात आहे. (विशेष प्रतिनिधी)