केंद्राचे पॅकेज म्हणजे आकड्यांचा खेळ : डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 02:18 AM2020-05-16T02:18:44+5:302020-05-16T02:19:20+5:30

कोरोनातून बाहेर पडण्याचा आराखडा अद्यापर्यंत केंद्राकडे नसल्याने लॉकडाऊन उघडल्यानंतर अधिक धोका वाढू शकतो

Centre's package is a numbers game - Amol Kolhe | केंद्राचे पॅकेज म्हणजे आकड्यांचा खेळ : डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

केंद्राचे पॅकेज म्हणजे आकड्यांचा खेळ : डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

Next

पिंपरी:  कोरोनाच्या तपासण्याची संख्या कमी आहे, त्यामुळे आपण स्वतला फसवितो की जगाला हे कळत नाही, तपासण्या वाढविण्याची गरज आहे. लॉकडाऊन हा कोरोनाला थांबविण्याचा एकमेव पर्याय नाही, हे आता सिद्ध झाले आहे. कोरोनातून बाहेर पडण्याचा आराखडा अद्यापर्यंत केंद्राकडे नसल्याने लॉकडाऊन उघडल्यानंतर अधिक धोका वाढू शकतो, अशी भिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.  केंद्राने दोन दिवसांपूर्वी जाहिर केलेले पॅकेज हे आकड्यांचा खेळ आहे, अशी टीकाही केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु केलेल्या ‘कोविड १९ वॉर रुम’ला खासदार डॉ. कोल्हे यांनी भेट दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने महानगरपालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. डॉ.  कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी विरोधी पक्षनेते  नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे,  माजी महापौर संजोग वाघेरे,  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त
अजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोडदे, संदीप खोत, स्मिता झगडे आदी उपस्थित होते. डॉ. कोल्हे यांनी कोरोनाबाबत नगरसदस्यांच्या समस्यांबाबत अडचणी विचारणा केली. त्यावर हर्डीकर यांनी कोरोनाची सुरुवात झाल्यापासून ते आत्तापर्यंत केलेली कार्यवाही आलेल्या अडचणी त्यावर मार्ग काढून केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली.

केंद्राच्या समितीला डॉ. कोल्हे यांनी प्रमुख सहा सूचना केल्या होत्या. त्यापैकी स्थलांतरित कामगाराचा प्रश्न सोडून अन्य विषयांवर कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले. डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘अधिक काळाचा लॉकडाऊन हा देशाच्या हिताचा नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून केंद्राकडून देण्यात येणाºया सूचना आणि आदेशांचा गोंधळ सुरू असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. राज्याराज्यांमध्ये नसलेला समन्वय याचा फटका आपल्या राज्यात जाणाºया नागरिकांना बसत आहे. सातत्याने होणाºया लॉकडाऊन उडल्यानंतरचा आराखडा केंद्राकडे तयार नसल्याचे आता तरी दिसून येत आहे. सक्षम पॉलिसी मेकर नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी पॅकेज जाहिर केले. हा आकड्याचा खेळ दिसून येतो. थेट किती लाभ मिळणार याबाबत स्पष्टता नाही.

Web Title: Centre's package is a numbers game - Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.