शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:32 IST

नुकसानीचा सविस्तर अहवाल मिळताच निधी देणार, लोणी, कोपरगावात सहकार मेळाव्यांना उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी (अहिल्यानगर) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. याबाबत राज्य शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार तत्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी येथे दिली. 

लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ शाह यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांसह राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, बाबासाहेब पाटील, जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा समारंभ आयोजित केला होता.

शाह म्हणाले, केंद्र सरकारने २०२५-२६ मध्ये ३ हजार १३२ कोटींची मदत मंजूर केली आहे. त्यापैकी एप्रिलमध्ये १ हजार ६३१ कोटींचे वाटप करण्यात आले असून, यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटींचे विशेष मदत पॅकेज देण्यात आले आहे. 

ते बनिया नाहीत, पण बनियापेक्षा कमी नाहीतशाह म्हणाले, राज्य सरकारमधील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यापैकी कोणीही बनिया नाही. मात्र, ते बनियापेक्षा कमी नाहीत. तिघांनीही माझ्याशी चर्चेदरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र काय मदत करणार? अशी हळूच विचारणा केली. त्यावर उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. 

‘तातडीने प्रस्ताव द्या’ पुणे : राज्य सरकारने लवकरात लवकर अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे द्यावा. मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधितांशी बोलावे आणि हा निधी घेऊन त्याचे वाटप सुरू करावे, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.  

मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा

शाह यांचे शनिवारी रात्री उशिरा शिर्डी येथे आगमन झाले. तेथे एका हॉटेलमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासमवेत चर्चा केली. 

सुमारे पाऊण तास त्यांची बंद खोलीत चर्चा होती. शहा यांच्यासोबत तिघेही एकत्र होते. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.

दिवाळीपासून स्वदेशीचा नारा द्या : देशातील १४० कोटी लोकांनी विदेशी वस्तू खरेदी करणार नाही, असा संकल्प केल्यास भारत महासत्ता बनेल. या दिवाळीपासून स्वदेशीचा अवलंब करा, असे आवाहनही शाह यांनी केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Center to provide substantial assistance to flood-hit Maharashtra: Amit Shah

Web Summary : Amit Shah assured substantial central aid to Maharashtra's rain-affected farmers after receiving a detailed report from the state government. He highlighted the allocated central assistance and urged promoting indigenous goods. Sharad Pawar requested state to send proposal promptly.
टॅग्स :Amit Shahअमित शाहFarmerशेतकरी