कोकणासह मध्य महाराष्ट्रात दमदार

By Admin | Updated: June 26, 2017 02:26 IST2017-06-26T02:26:41+5:302017-06-26T02:26:41+5:30

राज्यातील बहुसंख्य भागात मान्सून सक्रीय झाला असून शनिवारी रात्रीपासून अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणासह मध्य

Centrally powered with Konkan in Central Maharashtra | कोकणासह मध्य महाराष्ट्रात दमदार

कोकणासह मध्य महाराष्ट्रात दमदार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील बहुसंख्य भागात मान्सून सक्रीय झाला असून शनिवारी रात्रीपासून अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असून काही भागात अतिवृष्टी झाली आहे. पुढील तीन-चार दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकणात तळासरी येथे सर्वाधिक ४७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाडा येथेही ३७० मिमी पाऊस झाला असून ठाणे, कर्जत, पालघर, माथेरान या भागात १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही काही भागात अतिवृष्टी झाली असून इगतपुरी येथे सर्वाधिक २२० मिमी पावसाची नोंद झाली.

Web Title: Centrally powered with Konkan in Central Maharashtra