Central Railway Block; Mumbai-Pandharpur, Mumbai-Vijapur, Panvel-Nanded Express canceled | मध्य रेल्वेचा ब्लॉक; मुंबई-पंढरपूर, मुंबई-विजापूर, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस रद्द
मध्य रेल्वेचा ब्लॉक; मुंबई-पंढरपूर, मुंबई-विजापूर, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस रद्द

ठळक मुद्देमुंबई विभागातील कर्जत-लोणावळा परिसरात पडलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेमध्यंतरीच्या काळात दरड कोसळल्यामुळे रेल्वेचे ट्रॅक नादुरुस्त झाले होते़रेल्वेची सेवा पुन्हा सुरू झाली होती़ आता १६ ते २१ आॅक्टोबरपर्यंत पुन्हा रेल्वे ट्रॅकचे काम हाती घेण्यात आले

सोलापूर : मध्य रेल्वेच्यामुंबई विभागातील कर्जत-लोणावळा सेक्शनमधील अप साईडच्या रेल्वे ट्रॅकच्या कामामुळे १६ ते २१ आॅक्टोबरपर्यंत मुंबई-पंढरपूर, मुंबई-विजापूर व पनवेल-नांदेड ही हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

मुंबई विभागातील कर्जत-लोणावळा परिसरात पडलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले होते़ त्यामुळे मध्यंतरीच्या काळात दरड कोसळल्यामुळे रेल्वेचे ट्रॅक नादुरुस्त झाले होते़ त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे ट्रॅकचे काम हाती घेण्यात आले होते़ त्यानंतर रेल्वेची सेवा पुन्हा सुरू झाली होती़ आता १६ ते २१ आॅक्टोबरपर्यंत पुन्हा रेल्वे ट्रॅकचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाºया सहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाड्यांच्या मार्गात बदल केला असून काही गाड्या परावर्तित केल्या आहेत़ या बदलाची नोंद घेऊनच प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केले आहे़

या गाड्यांच्या मार्गात केला बदल

 • - गाडी क्र. १२७०२ हैद्राबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यंत धावेल.
 • - गाडी क्र. १२७०१ मुंबई-हैद्राबाद हुसेनसागर एक्स्प्रेस पुणे स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.
 • - गाडी क्र. १८५१९ विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यंत धावेल.
 • - गाडी क्र. १८५२० एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस पुणे स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.
 • - गाडी क्र. १७६१४ नांदेड-पनवेल एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यंत धावेल.
 • - गाडी क्र. १७६१३ पनवेल-नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.
 • च्गाडी क्र. ११०२५/११०२६ भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व्हाया मनमाड, दौडमार्गे परिवर्तन केली

रद्द करण्यात  आलेल्या गाड्या...

 • - गाडी क्रमांक ०७६१७ नांदेड-पनवेल हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस आणि 
 • - गाडी क्र. ०७६१८ पनवेल-नांदेड हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस रद्द
 • - गाडी क्र. ५१०२७ मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेंजर रद्द
 • - गाडी क्र. ५१०२८ पंढरपूर-मुंबई फास्ट पॅसेंजर रद्द
 • - गाडी क्र. ५१०२९ मुंबई-विजापुर फास्ट पॅसेजर रद्द
 • - गाडी. क्र. ५१०३० विजापूर-मुंबई फास्ट पॅसेंजर रद्द

तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी गाड्यांमध्ये परिवर्तन झाल्याची नोंद घ्यावी व आपला प्रवास सुनिश्चित करावा. 


Web Title: Central Railway Block; Mumbai-Pandharpur, Mumbai-Vijapur, Panvel-Nanded Express canceled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.