शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे : बाळासाहेब थोरात यांची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 19:22 IST

कोठेही अन्याय होत असताना अण्णा शांत राहतील असे वाटत नाही..

पुणे : भाजप सत्तेच्या काळजीपोटी अण्णांना उपोषणाला न बसण्याची विनंती करत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी हिटलरशाही प्रमाणे वागत आहे. हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

पुण्यात एका पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त बाळासाहेब थोरात आले होते.त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. थोरात म्हणाले, अण्णा हजारे मोठे सामाजिक नेते आहेत. कोठेही अन्याय होत असताना अण्णा शांत राहतील अस वाटत नाही. तसेच भाजपमधील आमदारांची घरवापसीसाठी चुळबुळ सुरू आहे.अण्णांच्या वयाचा विचार करता त्यांच्या तब्बेतीची काळजी वाटते आहे.

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार व शेतकरी यांच्यातील ११ बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्याच दरम्यान २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यावरून केंद्रातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याचवेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नव्या कृषी कायद्यांविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. 

नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यानंतर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री हे अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारanna hazareअण्णा हजारेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारणFarmerशेतकरीBJPभाजपा