एसटीमध्ये केंद्राचे दिव्यांग ओळखपत्र चालणार अर्धे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 07:00 AM2019-09-20T07:00:00+5:302019-09-20T07:00:04+5:30

दिव्यांगांना स्थानिक बससेवा, राज्य मार्ग परिवहन विभाग आणि रेल्वेच्या प्रवासात तिकिटाल सवलत दिली जाते....

The center's disability ID card will use run in ST half condition | एसटीमध्ये केंद्राचे दिव्यांग ओळखपत्र चालणार अर्धे

एसटीमध्ये केंद्राचे दिव्यांग ओळखपत्र चालणार अर्धे

googlenewsNext
ठळक मुद्देएसटीला स्वत:च्या निर्णयाचा विसर : अर्धवट निर्णयामुळे काही दिव्यांगांना एसटीचा दाखला आवश्यक केंद्र सरकारने देशातील दिव्यांगांसाठी विशेष युडीआयडी ओळखपत्र केले जाहीर

पुणे : दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्रांच्या जंजाळातून सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) तिकिटातील सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, ही सवलत देताना तीव्र अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींच्या सहायकाला सवलत मिळविण्यासाठी एसटीचा दाखला बंधनकारक केला आहे. त्यामुळे काही दिव्यांगांना गरज नसताना पुन्हा एसटीकडे दाखल्यासाठी खेटे मारावे लागतील. 
दिव्यांगांना स्थानिक बससेवा, राज्य मार्ग परिवहन विभाग आणि रेल्वेच्या प्रवासात तिकिटाल सवलत दिली जाते. मात्र, प्रत्येक सवलत मिळविण्यासाठी दिव्यांगांना वेगवेगळी ओळखपत्रे मिळवावी लागतात. रेल्वे, स्थानिक बससेवा आणि एसटी अशी तीन ओळखपत्रे बाळगावी लागतात. केंद्र सरकारने देशातील दिव्यांगांसाठी विशेष युडीआयडी ओळखपत्र जाहीर केले आहे. त्यासाठी सर्व कागदपत्रांची तपासणी, दिव्यंगत्वाचे प्रमाण याची खात्री केली जाते. मग, एकच ओळखपत्र राज्य आणि देशातील सेवांसाठी लागू करण्याची मागणी दिव्यांगांकडून करण्यात आली होती. 
एसटीच्या निम आरामसह इतर बससेवेमधे दिव्यांगांना प्रवास शुल्कामधे ७५ टक्के आणि त्याच्या मदतनीसास ५० टक्के सवलत देण्यात येते.

दिव्यांगांना एसटीसाठी वेगळे ओळखपत्र काढावे लागू नये यासाठी एसटीने अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार केंद्र सरकारने लागू केलेले युनिक आयडी ग्राह्य धरण्याचा स्तुत्य निर्णय बुधवारी (दि. १८) घेतला. मात्र, सहायकाला प्रवासात सवलत हवी असल्यास आगार व्यवस्थापकांच्या सही-शिक्क्याचा दाखला बंधनकारक असल्याचे आदेशात नमुद केले आहे. 
या पुर्वी १०० टक्के परावलंबी असलेल्या अंध-अपंग व्यक्तींना त्यांच्या मदतनीसास प्रवास शुल्कात ५० टक्के सूट मिळत होती. त्यात १२ ऑक्टोबर २०१८ रोजी सुधारणा करण्यात आली. आता ६५ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीस प्रवास शुल्कात सवलत मिळते. केंद्र सरकारने दिलेल्या युनिक कार्डमधे अपंगत्व टक्केवारीचा देखील उल्लेख असतो. त्यावरुन संबंधित व्यक्तीला ६५ टक्के अपंगत्व आहे, की त्या पेक्षा कमी हे समजू शकते. मग, त्यासाठी पुन्हा एसटीचे ओळखपत्र घेण्याची आवश्यकताच उरत नाही. असे, असताना एसटीने सहायकाला सवलत देण्यासाठी दाखल्याचे बंधन घातले आहे. 
----------------

दिव्यांग व्यक्तींना प्रवासात युडीआयडी कार्डवर देखील सवलत देण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. मात्र, यापुर्वी दिलेले पास देखील सुरुच आहेत. एसटीच्या वाहतूक व्यवस्थापकांनी देखील तसाच निर्णय घेतला आहे. मात्र, नव्या आदेशाचा स्थानिक पातळीवर चुकीचा अर्थ काढून दिव्यांगांना सवलत नाकारली जाऊ नये. 
हरिदास शिंदे, दिव्यांग चळवळीतील कार्यकर्ते
--------------------

Web Title: The center's disability ID card will use run in ST half condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.