"ड्रग्जप्रकरणी तीन- चार हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही"

By मुकेश चव्हाण | Published: September 30, 2020 10:26 AM2020-09-30T10:26:07+5:302020-09-30T10:26:30+5:30

या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात ते नष्ट करण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

The Center needs to launch a drug-free campaign, said NCP MP Supriya Sule. | "ड्रग्जप्रकरणी तीन- चार हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही"

"ड्रग्जप्रकरणी तीन- चार हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही"

Next

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येत आहे. मात्र तपास करणाऱ्या संस्थांकडून सेलिब्रेटी व हाय प्रोफेशनल अशाच काही मोजक्या महिलांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. परंतु  ड्रग्जप्रकरणी तीन-चार सेलिब्रेटी किंवा हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही. हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात ते नष्ट करण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

राज्यात जसे आम्ही तंबाखू मुक्त अभियान राबवत आहोत तसेच केंद्र सरकारने ड्रग्जमुक्त अभियान सुरु करण्याची मोठी गरज आहे. महाविद्यालयीन जीवनापासून मी तंबाखू विरोधात काम करत आले आहे. व्यसनांचे दुष्ट्चक्र हे जडसें उखडना जरुरी है, त्यामुळे व्यसनांना समाजात जागाच असू नये असे माझे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमाला सुप्रिया सुळे ह्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मराठा आरक्षणास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असली आहे. त्याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रावर अन्याय करू नये, अशी विनंती करावी,' अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.

 आयकर विभागाच्या नोटीसांना आम्ही सविस्तरपणे उत्तर देणार- सुप्रिया सुळे

माझ्या कुटुंबाला, शरद पवार साहेबांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना नुकतीच आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे. मात्र या नोटिसांना आम्ही सविस्तरपणे उत्तर देण्याचे ठरवले आहे. पण मागच्या वर्षी सुद्धा अशाचप्रकारे एक नोटीस शरद पवार साहेबांना मिळाली होती. त्याचा परिणाम संबंध महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिला आहे. त्यामुळे 'त्यांनी त्यांचे काम केले आहे, आम्ही आमचे काम करू..'' अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आयकर विभागाच्या नोटिसांवर भाष्य केले आहे. 

Web Title: The Center needs to launch a drug-free campaign, said NCP MP Supriya Sule.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.