Celebrity Secrets to be released at 'Most Stylish Awards' | ‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात यंदाही उघड होणार सेलिब्रिटींचे सिक्रेट्स!

‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात यंदाही उघड होणार सेलिब्रिटींचे सिक्रेट्स!

ठळक मुद्दे‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात यंदाही उघड होणार सेलिब्रिटींचे सिक्रेट्स!

सेलिब्रिटींचं विश्‍व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनातली गुपितं आणि बरंच काही जाणून घेण्याची लोकांना इच्छा असते. त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक बाबीची माहिती लोकांना हवी असते. हे सारं अनुभवण्याची संधी ‘लोकमत’ आयोजित पहिल्यावहिल्या ‘मोस्ट स्टायलिश अँवॉर्ड’ सोहळ्यात लोकांना मिळाली होती. सोहळ्यात तारे-तारकांबरोबरच विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी हजेरी लावत आपली गुपितं उघड केली. खरं तर त्यांनी सांगितलेली ही गुपितं थक्क करणारी होती. 
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तर थेट गर्लफ्रेंडबाबतचा खुलासा केला होता. होय, जेव्हा आदित्य ठाकरे यांना त्यांच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या प्रश्नाचे अतिशय तोलूनमापून उत्तर दिले. गर्लफ्रेंडबद्दल सर्वात अगोदर तुम्ही कोणाशी बोलणार? असे विचारताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आईसोबत ही गोष्ट शेअर करणार असल्याचे म्हटले. याशिवाय त्यांनी प्रश्नांच्या रूपात आलेले सर्व बाउन्सर पॉलिटीकली डक केले. अभिनेत्री सई ताह्मणकरनेही तिची इच्छा अतिशय बिनधास्तपणे बोलून दाखवली. जेव्हा सईला, तुला कोणाबरोबर डेटवर जायला आवडेल? असे विचारण्यात आले तेव्हा तिने भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यासोबत डेटवर जायला आवडेल, असे सांगितले. सईबरोबरच अमृता खानविलकर या अभिनेत्रीनेही आपल्या डेट पार्टनरचे सीक्रेट उघड केले. तिने अभिनेता रणवीरसिंहबद्दल तिच्या मनात असलेले प्रेम जाहीर केले. 
स्टाइल आयकॉन अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनम कपूरने पुरस्कार स्वीकारतानाच तिच्या या हटके स्टाइलचे सीक्रेट सांगितले. सोनमने, माझे वडील अनिल कपूरच माझे स्टाइल आयकॉन असल्याचे म्हटले होते. सोनमच्या या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिला दादही दिली होती. स्टाइलच्या या सोहळ्यात शाल्मली खोलगडे या गायिकेचाही गौरव करण्यात आला. या वेळी शाल्मलीकडे तिच्या सुरेल आवाजाचा नजराणा पेश करण्याची फर्माइशही करण्यात आली. तिने ‘इश्क जादे’ या चित्रपटातील ‘मैं परेशान परेशान’ हे गाणं गात मैफलीत रंग भरला. तसेच या गाण्यामुळेच मला खर्‍या अर्थाने ओळख मिळाल्याचेही तिने स्पष्ट केले.  
यंदाच्याही या रंगारंग सोहळ्यात सेलिब्रिटींच्या अशाच काहीशा सीक्रेटचा उलगडा होणार आहे. 
येत्या १४ नोव्हेंबर रोजी 
होणार्‍या या सोहळ्यात इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Celebrity Secrets to be released at 'Most Stylish Awards'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.