शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयकडे कापसाचा ओघ ओसरला

By admin | Updated: April 8, 2015 01:43 IST

दरवाढ न झाल्याने शेतक-यांचा ओढा व्यापा-यांकडे.

अकोला : कापूस पणन महासंघाच्या (सीसीआय) वतीने चुकीच्या पद्धतीने सरकीचे वितरण होत असल्याने कापूस दरवाढीला ह्यब्रेकह्ण लागला आहे. दरवाढ होत नसल्याने उत्पादकांनी सीसीआयकडे पाठ फिरवत व्यापार्‍यांना कापूस विकण्यास सुरुवात केली आहे. व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना क्विंटलमागे ५00 रुपयांपर्यंत अधिक दर दिला जात असल्याने शेतकर्‍यांचा ओढावा व्यापारी वर्गाकडे वाढला आहे. खरिपात कापूस उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांकडून सीसीआयला मोठय़ा प्रमाणावर कापूस विकला जातो. त्यामुळे हंगामात दररोज सीसीआयकडे तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस एकट्या अकोला जिल्ह्यातून जात होता. आता हे प्रमाण कमालीचे घटले आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत राखून ठेवला होता; मात्र सीसीआयकडून कापसाला क्विंटलमागे ३९५0 रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला नाही. हंगाम संपत आला तरी दरवाढ करण्यात आली नाही. उलट व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना क्विंटलमागे ४६५0 रुपये दर मिळत आहे. तब्बल ५00 ते ७00 रुपये क्विंटलमागे अधिक मिळत असल्याने शेतकर्‍यांनी सीसीआयकडे पाठ फिरवून व्यापार्‍यांना कापूस विकणे सुरू केले आहे. *गाठीचे दर वाढले तरी कापसाची दरवाढ नाही सीसीआयकडून कापूस खरेदी केल्यानंतर प्रक्रिया करून रुईच्या गाठी केल्या जातात. या गाठीचे दर वाढले आहे. सरकीच्या तेलासोबतच ढेपीची मागणी वाढली असून, त्यामुळे त्यांचे दरही वाढले आहेत. असे असतानाही कापसाला सीसीआयकडून दरवाढ दिली जात नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. चुकीच्या पद्धतीने सरकी वितरणाचा फटका ४सीसीआयकडून आवश्यकता व क्षमतेपेक्षा अधिक सरकीचे वितरण तेल काढणार्‍या कंपन्यांना होत आहे. त्यामुळे या कंपन्या सीसीआयला सरकीचे दर वाढवून देण्यास तयार नाही. परिणामी सीसीआयला कापसाचे दर वाढविता आले नाहीत.