शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

CBSE 10th Result 2019: सीबीएसई दहावीचा टक्का वाढला; चौघांना ५०० पैकी ४९७ गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:48 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

नवी दिल्ली/मुंबई/नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवले आहेत. नवी मुंबईतील एपीजे स्कूलची दीपस्ना पांडा, ठाणे येथील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलची धात्री कौशल मेहता, न्यू हॉरीझन स्कॉलर्स स्कूलचा अ‍ॅड्री दास आणि नागपूरची आर्या डाऊ यांचा त्यामध्ये समावेश आहे. देशभरातील निकाल ९१.१ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.सीबीएसई दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिलदरम्यान झाली. देशभरातून १७ लाख ६१ हजार ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ लाख ४ हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील १३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण घेऊन संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला आहे.पुण्याचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाने ९९ टक्के अशा विक्रमी निकालाची नोंद केली. ९० पेक्षा जास्त टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय आहे.नवी मुंबईतील ऋजुता कुलकर्णी, प्रांजल गोयल, मुंबईतील अनिकेत बोरकर, आदित्य संखला आणि प्रणिता राव या पाच जणांना ५०० पैकी ४९५ गुण मिळाले.आर्या डाऊ विदर्भात टॉपनागपुरच्या आर्या डाऊ हिने ९९.४० टक्के गुण मिळवून विदर्भात अव्वल तर, देशात तृतीय स्थान पटकावले. ती भारतीय कृष्ण विहार शाळेची विद्यार्थिनी आहे. याशिवाय विदर्भामध्ये सेंटर पॉर्इंट स्कूल अमरावती बायपास शाखेच्या राघवी शुक्लाने ९९ टक्के गुण मिळवले.दीपस्ना पांडाला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. ती म्हणाली, मी शाळेत पहिली येईन असे ध्येय बाळगले होते. त्यासाठी वेळापत्रक आखून त्याप्रमाणे दररोज ४ तास काटेकोर अभ्यास केला. धातरी कौशल मेहता या टॉपरला इंजिनिअर बनायचे आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईत प्रवेश घेण्याची तिची इच्छा आहे. धातरीला गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, संस्कृत या विषयांत प्रत्येकी १०० गुण व इंग्रजीमध्ये ९७ गुण मिळाले आहेत.आयएएस होण्याचे आयुषीचे स्वप्नगोव्यातील टॉपर आयुषी साहूू हिला आयएएस बनायचे आहे. तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. आयुषीने अभ्यासाचा मनावर कधी ताण पडू दिला नाही. शाळव्यतिरिक्त घरीही ती रोज दोन ते तीन तास अभ्यास करत असे. तिला गणितात १००, सामाजिक विज्ञानात ९९, विज्ञानामध्ये ९८, हिंदीमध्ये ९८ गुण मिळाले आहेत.इराणी यांच्या मुलीला ८२ टक्केकेंद्रीय मंत्री व अमेठी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृति इराणी यांची मुलगी झोईश हिला सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळाले आहेत. नुकताच १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. त्यात इराणी यांचा मुलगा झोहरला ९१ टक्के गुण मिळाले होते.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाMaharashtraमहाराष्ट्र