शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सोहराबुद्दीन प्रकरणात बंजारा व इतर आयपीएस अधिका-यांच्या सुटकेला आव्हान देणार नाही- सीबीआय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 5:16 PM

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात कोणत्याही आयपीएस अधिका-याच्या सुटकेला केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आव्हान देणार नाही. सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबई- सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात कोणत्याही आयपीएस अधिका-याच्या सुटकेला केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) आव्हान देणार नाही. सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती दिली आहे. या प्रकरणात सीबीआयनं याआधीही काही कनिष्ठ अधिका-यांच्या सुटकेला आव्हान दिलं होतं, अशी माहिती सीबीआयचे वकील संदेश पाटील आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी उच्च न्यायालयात दिली आहे.आता आम्ही कोणत्याही वरिष्ठ अधिका-यांच्या सुटकेला आव्हान देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. या वरिष्ठ अधिका-यांमध्ये गुजरातचे माजी उपमहासंचालक डीजी वंजारा, राजस्थानचे आयपीएस अधिकारी दिनेश एमएन आणि गुजरातचे आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांचा सहभाग आहे. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात हे सर्व अधिकारी आरोपी होते. सोहराबुद्दीन शेख हिचा भाऊ रुबाबुद्दीन यानं न्यायालयात या प्रकरणावर पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेत ट्रायल कोर्टानं या अधिका-यांना दिलेल्या सुटकेला आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यानच सीबीआयनं स्वतःचं म्हणणं मांडलं आहे. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमकप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने डी. जी. वंजारा, राजकुमार पांडियन आणि दिनेश एम. एन. यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीन याचा भाऊ रुबाबुद्दीन याने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सुनावणीदरम्यान न्या. ए. एम. बदर यांनी या तिघांनाही नोटीस बजावत सीबीआयला या तिघांच्याही कार्यालयाचा पत्ता रुबाबुद्दीन याला देण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, याचिकाकर्त्याने या केसच्या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने त्यास स्पष्ट नकार दिला. या खटल्याला स्थगिती देण्याऐवजी या याचिकेवरील सुनावणी जलदगतीने घेऊ, असे न्या. बदर यांनी म्हटले.सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक केसमधून विशेष सीबीआय न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, राजस्थानचा व्यावसायिक विमल पटनी, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी.सी. पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक गीता जोहरी, गुजरात पोलीस अधिकारी अभय चुंदासमा आणि एन.के. आमिन यांचीही आरोपातून मुक्तता केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागSohrabuddin Sheikh encounter caseसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण