शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; द्राक्षबागा, ज्वारी, हरभरा आडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 04:36 AM2021-02-19T04:36:49+5:302021-02-19T06:38:46+5:30

Rains : सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही ज्वारी, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, ज्वारी व कडबा काळा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

A catastrophic crisis on farmers; Vineyards, sorghum, gram horizontally | शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; द्राक्षबागा, ज्वारी, हरभरा आडवा

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; द्राक्षबागा, ज्वारी, हरभरा आडवा

Next

कोल्हापूर/औरंगाबाद :  बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांना फटका बसला. सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा व झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले. 
सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही ज्वारी, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, ज्वारी व कडबा काळा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मराठवाड्यात नुकसान
मराठवाड्यातील काही भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात देवठाणा, कांदेवाडीसह इतर गावांमध्ये बुधवारी मध्यरात्री गारांसह जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या परिसरातील संपूर्ण शेती पांढरीशुभ्र झाली. सर्वत्र गारांचे खच साचले होते. 

विदर्भाला तडाखा
विदर्भातही पावसाने तडाखा दिला. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती जिल्ह्यात गारपीट झाली.  हरभरा, गहू, कापूस, संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिकला अवकाळीचा फटका
नाशिक जिल्ह्यालाही अवकाळीचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळसह नवापूर तालुक्यात गारपीट झाली. 

आजही पावसाची शक्यता 
शुक्रवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

कुलू-मनाली नव्हे, चिखलदरा
मेळघाटातील खंडूखेडा परिसरात झालेल्या गारपिटीने सिमला, कुलू-मनालीची आठवण झाली. चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागासह चुनखडी, घाना, भुतरुम, बिच्छूखेडा परिसरात गुरुवारी दुपारनंतर गारपीट झाली. 

वीज पडून चौघांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यातील पेंढराबोडी आणि कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे वीज पडून सचिन रामाजी सहारे (३५) व अमोल नारायण काखे (२५) यांचा मृत्यू झाला. 
नांदेड जिल्ह्यात आनंदराव श्यामराव चव्हाण (रा. चिंचखेड, ता. किनवट), माधव दिगंबर वाघमारे (रा. मौजे सुजलेगाव, ता. नायगाव) यांचा वीज पडून मृत्यू झाला. 
 

Web Title: A catastrophic crisis on farmers; Vineyards, sorghum, gram horizontally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.