Ulhasnagar: रुग्णाच्या जीवाशी खेळ, उल्हासनगर माणेरेगावातील दोन बोगस डॉक्टरावर गुन्हा
By सदानंद नाईक | Updated: May 20, 2025 18:53 IST2025-05-20T18:51:47+5:302025-05-20T18:53:00+5:30
Ulhasnagar Fake Docter News: याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरावर गुन्हा दाखल झाला.

Ulhasnagar: रुग्णाच्या जीवाशी खेळ, उल्हासनगर माणेरेगावातील दोन बोगस डॉक्टरावर गुन्हा
सदानंद नाईक, उल्हासनगर: माणेरे गावात साई क्लिनिक चालविणारे डॉ श्रीकृष्ण कुमावत व डॉ देवेंद्र पुजारी यांच्याकडे महाराष्ट्र शासन वैधकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्याकडील वैधकीय व्यवसाय करण्याचा अधिकारी नसताना क्लिनिक चालवीत असल्याचा ठपका ठेवून तक्रार दाखल केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर शेजारील माणरेगाव येथे साई क्लिनिक डॉ श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी चालवीत होते. उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरा विरोधात मोहीम उघडली होती. त्यावेळी वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी साई क्लिनिक मधील बोगस डॉक्टरावर कारवाईचे आदेश दिले. मात्र माणेरे गाव हद्द कल्याण-डोंबिवली महापालिका मध्ये येत असल्याने, क्लिनिकसह डॉक्टरावर कारवाई करण्याचे पत्र कल्याण महापालिका आरोग्य विभागाला दिले. डॉ समीर सरवणकर यांच्या तक्रारीनंतर तब्बल ४ महिन्यानंतर डॉ कुमावत व पुजारी यांच्या विरोधात बोगस डॉक्टराचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गुन्हे दाखल झालेले क्लिनिक सताड उघडे
उल्हासनगर महापालिका हद्दीत तब्बल २६ बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. महापालिका आरोग्य विभागाने तक्रारीची शहानिशा केल्यावर, १८ डॉक्टरावर महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्याकडील वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकारी नाही. असा ठपका ठेवून शहरातील विविध पोलीस ठाण्यात या बोगस डॉक्टरांचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर डॉक्टर व क्लिनिकवर सबंधित पोलिसांनी कारवाई करायला हवी. मात्र तसे न होता. बोगस डॉक्टरांचे क्लिनिक सताड सुरु असून शेकडो रुग्णाच्या जीवासी खेळत आहेत, असे मत वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी व्यक्त केले.