शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात

By admin | Updated: July 15, 2015 02:38 IST

मुंबईतील मालवणी भागात १०४ जणांचा बळी घेणाऱ्या दारूकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल. दोषींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी

मुंबई : मुंबईतील मालवणी भागात १०४ जणांचा बळी घेणाऱ्या दारूकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल. दोषींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकार न्यायालयात करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. या दारूकांडामध्ये पोलीस किंवा इतर अधिकारी/कर्मचारी सामील असल्याचे आढळल्यास त्यांनाही सहआरोपी केले जाईल. त्यांना सेवेतून बडतर्फ केल जाईल. आतापर्यंत ९ पोलीस अधिकारी तर ४ उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या दारूकांडाबाबत सपाचे अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. विषारी दारू करण्यासाठीचे मिथेनॉल आणि इथेनॉल गुजरातमधून आणले जात होते. ते एकत्र करून विकले जायचे. या कांडामध्ये मात्र केवळ मिथेनॉलच विकण्यात आले म्हणजे थेट विषच पाजण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजपाच्या मनीषा चौधरी आणि आशिष शेलारांनी दहिसर नाक्यावरील स्कॅनर यंत्रणा बंद असल्याने अवैध वाहतूकवाल्याचे फावते, असा आरोप केला. ही यंत्रणा तत्काळ बसविली जाईल आणि ती आतापर्यंत का बंद होती याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दारूबंदी व्यापक करणारलक्षवेधीवरील चर्चेत काही सदस्यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदीची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ही बंदी केवळ एका राज्याने करून उपयोग नाही. आंध्र प्रदेशमध्ये तसा निर्णय झाला, पण तो नंतर मागे घ्यावा लागला. राज्यात तीन जिल्ह्यांमध्ये अशी बंदी आहे, ती व्यापक करण्याचा विचार केला जाईल. उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षता पथकामध्ये आयएएस अधिकारी नेमण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुक्ताईनगरमार्गे येते दारू अवैध दारूसाठी केवळ पोलीस जबाबदार नाहीत़ जास्त जबाबदारी उत्पादन शुल्क खात्याची आहे, असा आरोप करीत शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील आमदार गुलाबराव पाटील यांनी उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांच्या खात्यावर निशाणा साधला. मुक्ताईनगरमार्गे राज्यात अवैध दारू येते, असा आरोपही त्यांनी केला.