मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यात कारचा भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 17:57 IST2017-08-30T16:08:40+5:302017-08-30T17:57:46+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यात बुधवारी दुपारी कारचा भीषण अपघात झाला. दुपारी 2.50 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यात कारचा भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू
लोणावळा,दि. 30 - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यात बुधवारी दुपारी कारचा भीषण अपघात झाला. दुपारी 2.50 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कारवरील (MH 01 AX 6579) चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी बोगद्यातील भिंतीवर जोरदार आदळली व भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
मृत पावलेले व जखमी व्यक्ती मुंबईतील ताडदेव परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या खंडाळा महामार्ग पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले व अपघातग्रस्त कार बोगद्यातून लगेचच बाहेर काढल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाही.