शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

'' मराठा'' जातीचे भांडवल करणारे पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 07:00 IST

मराठा क्रांती आणि संभाजी ब्रिगेडच्या तेरा उमेदवारांना मिळालेली एकूण मते जेमतेम २१ हजार ७४२ आहेत.

ठळक मुद्दे‘मराठा’ म्हणून मते मागणाऱ्यांना मराठा समाजाने नाकारलेनाशिक, बीड, हातकणंगले, औरगांबाद या चार लोकसभा मतदारसंघात तर ‘मराठा’ म्हणून प्रचार

सुकृत करंदीकरपुणे : कमालीच्या संवेदनशील ठरलेल्या कोपर्डी प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चे निघाले. या मोर्चांना लाखोंच्या संख्येने उत्स्फूर्त गर्दी झाली. यामुळे मराठा जात संघटीत झाल्याचे चित्र निर्माण झाले. त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झाला.  मात्र मराठा जातीचा उपयोग राजकारणासाठी करु पाहणाऱ्यांना मराठा समाजाने सपशेल नाकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे.मराठा क्रांती आणि संभाजी ब्रिगेडच्या तेरा उमेदवारांना मिळालेली एकूण मते जेमतेम २१ हजार ७४२ आहेत.नाशिक, बीड, हातकणंगले, औरगांबाद या चार लोकसभा मतदारसंघात तर ‘मराठा’ म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचार झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात यापैकी नाशिक आणि हातकणंगले मतदारसंघात मराठी जातीचे उमेदवार निवडून आले. बीड आणि औरंगाबादेत मराठा उमेदवार पराभूत झाले. शिरुर (जि. पुणे) लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव-पाटील विरुद्ध अमोल कोल्हे  असा सामना झाला. या लढतीत प्रारंभी मराठा विरुद्ध माळी असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र येथेही कोल्हे यांनी ‘शिवरायांचा मावळा हीच माझी जात’ असे सांगून जातीय ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न केला. दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कोल्हे यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी व संभाजी राजांच्या भूमिकांचा प्रभाव प्रचंड होता. त्यामुळे  कोल्हे यांच्याविरुद्धच्या लढतीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न मतदारांनी निष्फळ ठरवला.या चार मतदारसंघांशिवाय राज्यातल्या तेरा लोकसभा मतदारसंघांमधून संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्रीय महासंघ, शिवप्रहार संघटना आदी मराठा जातीशी संबंधित संघटनांचे कार्यकर्ते-पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र या तेराही उमेदवारांना ‘मराठा’ म्हणून मतदान झाल्याचे दिसून आलेले नाही. मराठा उमेदवार विरुद्ध मराठा उमेदवार अशा पंधरा लढती राज्यात झाल्या. यातल्या बहुतांश ठिकाणी विजयी झालेले मराठा उमेदवार हे प्रस्थापित किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेलेच आहेत. महाराष्ट्र क्रांती सेना नावाचा पक्ष काढलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सुरेशदादा पाटील यांचा पक्ष तेरा जागा लढवणार होता. मराठा आरक्षणाबाबत घेतलेला शासन निर्णय निवडणुकीच्या तोंडावर जाहीरपणे फाडून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. प्रत्यक्षात मात्र हे  पाटील निवडणूक न लढवता भाजपाच्या गोटात सहभागी झाल्याचेही दिसून आले.         .............बहुजनांनी बांधली मतांची मोटअभूतपूर्व ठरलेल्या मराठा क्रांती मोर्चांच्या पार्श्वभूमीवर राज्यात दलित आणि ओबीसींचेही महामोर्चे काढण्यात आले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली बहुजन वंचित आघाडी स्थापन झाली. या आघाडीच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी एक लाखापासून कमाल साडेतीन लाखांपर्यंतची मते मिळवली. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या भरघोस मतांमुळे काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीच्या आठ उमेदवारांना थेट फटका बसला. अशीच कामगिरी मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना करता आली नाही. मराठा क्रांती मोर्चाला कोणतेही नेतृत्त्व नव्हते. निर्नायकी असलेल्या लाखोंच्या मोर्चांमधून कोणतेही नेतृत्त्व उभे राहू शकले नाही. ...........

प्रस्थापित मराठ्यांची सलगी सत्तेशीकोल्हापुरचे छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे (सिंधुदूर्ग), विजयसिंह  मोहिते-पाटील (अकलूज), राधाकृष्ण विखे-पाटील (नगर), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (सातारा), नरेंद्र पाटील (सातारा), अतुल भोसले (कराड) आदी राज्यातली अनेक प्रस्थापित राजकीय घराणी भाजपमध्ये सहभागी झाली. त्याचवेळी मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या तसेच या मोर्चांमध्ये निर्णायक स्थान असलेल्या अनेक जबाबदार नेत्यांनी मात्र राजकीय भूमिका घेण्याचे टाळत लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणे पसंत केले. या जाणत्या मंडळींनी त्यांच्या तटस्थतेबद्दलचे संदेशही जाणीवपूर्वक सोशल मीडियातून प्रसृत केले. 

मतदारसंघ                    उमेदवार (संबंधित संघटना)                                                      मिळालेली मतेउस्मानाबाद                   नेताजी गोरे (माजी प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ)                              ६,६७२सोलापूर                     श्रीमंत म्हस्के (संभाजी ब्रिगेड)                                                             २,०१५शिरुर                         शिवाजी पवार (संभाजी ब्रिगेड)                                                              ६७० जालना                       शाम शिरसाठ (संभाजी ब्रिगेड)                                                            ११४६माढा                          विश्वंभर काशिद  (माजी पदाधिकारी, मराठा सेवा संघ)                       ११५६                                संदीप पोळ (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)                                         १५१७मुंबई उत्तर                   अमोल जाधवराव (संभाजी ब्रिगेड)                                                   ८९७औरंगाबाद                   अंकुश पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी)                                                   ३८७नगर                          संजीव भोर (शिवप्रहार संघटना)                                                        ३७९३ठाणे                          विठ्ठल चव्हाण (संभाजी ब्रिगेड)                                                           ५३४                                  विनोद पोखरकर (समन्वयक, मराठी क्रांती मोर्चा)                              ७६६मुंबई ईशान्य                 स्नेहा कुºहाडे (मराठी क्रांती मोर्चा)                                               १२७६   

टॅग्स :PuneपुणेmarathaमराठाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड