एलबीटी त्वरित रद्द करा

By Admin | Updated: December 16, 2014 01:13 IST2014-12-16T01:13:44+5:302014-12-16T01:13:44+5:30

राज्यातील व्यापाऱ्यांचा एलबीटी विरोधातील रोष वाढत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण त्यांची घोषणा ही

Cancel LBT Now | एलबीटी त्वरित रद्द करा

एलबीटी त्वरित रद्द करा

नागपूर : राज्यातील व्यापाऱ्यांचा एलबीटी विरोधातील रोष वाढत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण त्यांची घोषणा ही घोषणाच ठरणार काय, असे संशयाचे वातावरण व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे. एलबीटी रद्द करण्यासाठी सात दिवस उरले असताना, शासनातर्फे काहीही हालचाली होत नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत.
पर्यायी कर आकारा
शासनाने घोषणा केल्यानुसार एलबीटी त्वरित रद्द करून पर्यायी कर आकारावा. कर भरण्यास व्यापाऱ्यांचा नकार नाही. पण इन्स्पेक्टरराज आणि क्षुल्लक कारणांवरून व्यापाऱ्यांवर टाकण्यात येणाऱ्या धाडीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. भाजपाने निवडणुकीच्या घोषणापत्रात नमूद केल्यानुसार सत्तेवर येताच एलबीटी रद्द करायला हवा होता. पण सरकारला त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या घोषणेनुसार एलबीटी रद्द करण्यासाठी आता सात दिवस उरले आहेत.
बी.सी. भरतीया, राष्ट्रीय अध्यक्ष,
अखिल भारतीय व्यापारी महासंघ.
एलबीटी रद्द होण्याचा विश्वास
दिलेले आश्वासन सरकार पाळेल, असा विश्वास आहे. अधिवेशनात एलबीटी रद्द होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांशी लवकरच बोलणी करणार आहोत. तसे पाहता एलबीटी हा व्यापाऱ्यांसाठी घातकच आहे. व्यापारी त्रस्त आहेत. कमी कलेक्शनमुळे बहुतांश विकास कामे थांबली आहेत. अन्य राज्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास देशात महाराष्ट्र वगळता कुठेही एलबीटी नाही. त्यानंतरही तेथील विकास कामे वेगात सुरू आहेत. लगतच्या राज्यापासून बोध घेऊन सरकारने एलबीटी रद्द करावा.
दीपेन अग्रवाल, माजी अध्यक्ष,
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स.

Web Title: Cancel LBT Now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.