शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मंत्रिपदावरून नाराजी आणि खातेवाटपाबाबत संजय राऊत यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 12:04 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेरीस 30 डिसेंबर रोजी झाला होता.

मुंबई - उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भावाला स्थान न मिळाल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्रिपदावरून असलेली नाराजी आणि खातेवाटपाबाबत मोठे विधान केले आहे. खातेवाटपासून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही कुरबूर नाही. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या शिवसेना नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधून मार्ग काढती, असेही संकेत राऊत यांनी दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिनाभर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेरीस 30 डिसेंबर रोजी झाला होता. मात्र या विस्तारामध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे अनेक नेते नाराज झाले होते. तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावणारे संजय राऊत हे सुद्धा भावाला मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्रिपदावरून असलेली नाराजी आणि रखडलेल्या खातेवाटपाबाबत माहिती दिली. संजय राऊत म्हणाले की, ''महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरून कुरबुरी आहे असे म्हणता येणार नाही. पक्षांनुसार खातेवाटप आधीच झालेले आहे. आता जी नाराजी आहे ती त्या त्या पक्षातील अंतर्गत खातेवाटपावरून आहे. हे सरकार तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केले आहे, हे विसरता येणार नाही. तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही खातेवाटपाबाबत विलंब झालेला नाही. सध्या सुकाणू समितीच्या माध्यमातून समन्वय साधला जात आहे. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होईल.'' 

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या नाराजीबाबतही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ''मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील काही नेते नाराज आहेत, हे खरे आहे. पण महाविकास आघाडीती शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह केवळ 15 मंत्रिपदे आली आहेत. त्यातून छोटे मित्रपक्ष आणि अपक्षांनाही शिवसेनेने वाटा दिला आहे. आघाडीतील मोठा पक्ष या नात्याने आम्ही शब्दाला जागून मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. आता मंत्रिपद मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते, तसे वाटणे हा काही गुन्हा नाही. मात्र आता नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे हे स्वत: लवकरच सर्वांशी बोलतील आणि त्यातून मार्ग काढतील,''असे राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही यावर माझा विश्वास नाही, असे सांगत राऊत यांनी भास्कर जाधव यांना टोला लगावला. तसेच दिवाकर रावते आणि रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते मंत्रिपदासाठी तडफड करणारे नाही, असेही राऊत यांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊत