शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘सीएए ; विरोधकांनाही हवी आहे अशांतताच : भास्करराव आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 20:38 IST

भाजपचे शरीर स्वत:चे आणि मेंदू मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा

ठळक मुद्दे विकासापासून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून गाजरसीएए, एनआरसीचा निर्णय योग्य असला तरी अयोग्यवेळी घेतल्याने संभ्रम

पुणे : देशामध्ये महागाई, मंदी, बेरोजगारी यांसारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), भारतीय नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणण्यात आले. विकासापासून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप एक प्रकारे गाजर दाखवितआहे . तर विरोधकांनाही अशांतताच हवी आहे, अशी टीका ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी केली. सीएए, एनआरसीचा निर्णय योग्य असला तरी अयोग्यवेळी घेतल्याने संभ्रम निर्माण झाल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.आयपीजे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शुक्रवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी उद्योजक अजय शिर्के, ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार व अ‍ॅड. नीला गोखले व्यासपीठावर उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, जगामध्ये खुप असमतोल निर्माण झाला आहे. अमेरिकेसह युरोपातील देशांमध्येही घुसखोरी सुरू आहे. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारताची फाळणी धार्मिकतेवर आधारीत होती. वांशिक वादातून बांग्लादेशाची निर्मिती झाली. आता तिथून दररोज घुसखोरी होत आहे. इतर देश घुसखोरांना गोळ््या घालत आहेत. परंतु आपण मानवतेच्या दृष्टीने त्याचा विचार करतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांनी स्वत:ला मुस्लिम राष्ट्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे अशा देशांमधील मुस्लिमांव्यतिरिक्त इतर धर्मियांना संरक्षण देण्यासाठी म्हणून हा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये हिंदु, बौध्द, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन यांचा समावेश आहे. हेच मुद्दे अधिक वादग्रस्त ठरले आहेत. शेजारील तीन देशांमधून आलेल्या मुस्लिमांची चौकशी करूनच त्यांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. घुसखोरांमध्ये सर्वाधिक मुस्लिम आहेत. तसेच विध्वंसक कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग जास्त आहे. त्यामुळे सीएए, एनआरसी झालेच पाहिजे. पण वेळ कोणती हा वादाचा मुद्दा आहे. त्यामागे राजकीय कारणे आहेत. सध्या तत्वनिष्ठ राजकारण राहिले नाही. हे स्वार्थाचे राजकारण आहे. -------भाजपाचा मेंदु आरएसएस‘सीएए’मधून केवळ मुस्लिम घुसखोरांना वगळण्यात आल्याने हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) अजेंडा असल्याची शंका निर्माण झाली आहे. भाजपचे शरीर स्वत:चे आणि मेंदू मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे. हिंदुत्व हा आरएसएसचा अजेंडा असून ही भाजपाची कमकुवत बाजू आहे विरोधकांकडून याचे राजकीय भांडवल केली जात आहे, अशी टीका करत अ‍ॅड. आव्हाड यांनी अशा स्थितीत नागरिकत्व कायदा गंभीरपणे घ्यायला हवा, नागरीकत्व सांभाळायलाच हवे, असे सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGovernmentसरकारBJPभाजपा