बसखाली गेली दुचाकी...चालकाने मारली उडी !
By Admin | Updated: August 8, 2016 17:38 IST2016-08-08T17:38:42+5:302016-08-08T17:38:42+5:30
सोमवारची भरदुपारी १२ ची वेळ... बीड आगाराची एमएच-२० बीएल-१६३४ ही शेगाव-बीड बस आगारात प्रवेश करीत होती... त्या दरम्यानच मागून येणा-या भरधाव दुचाकीस्वाराचा ताबा सुटला.

बसखाली गेली दुचाकी...चालकाने मारली उडी !
>- राजेश खराडे
बीड, दि.08 - सोमवारची भरदुपारी १२ ची वेळ... बीड आगाराची एमएच-२० बीएल-१६३४ ही शेगाव-बीड बस आगारात प्रवेश करीत होती... त्या दरम्यानच मागून येणा-या भरधाव दुचाकीस्वाराचा ताबा सुटला. सर्व जण श्वास रोखून पुढे काय होते ते पाहू लागले. तेवढ्यात त्याने प्रसंगावधान राखून दुचाकीवरून उडी मारत थेट मृत्यूलाच हुलकावणी दिली. त्यामुळे बसखाली त्याची दुचाकी गेली परंतु तो दुचाकीस्वार मात्र सहीसलामत बचावला. किरकोळ खरचटण्यापलिकडे फारशी दुखापत त्याला झाली नाही.
प्रत्यक्षदर्र्शींच्या अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना.. औरंगाबाद महामार्ग शहरातून जातो. या महामार्गावरच बीडचे बसस्थानक आहे. नेहमीप्रमाणेच आजही वाहनांची आणि पादचाºयांची बसस्थानकासमोर वर्दळ वाढली होती. वाहतूक नियंत्रकही वाहतूक नियंत्रण ठेवण्यात व्यस्त होता. मात्र अचानकपणे गुजरात पासिंगची करिझ्मा ही दुचाकी बसखाली गेल्याने खळबळ उडाली. दुचाकीस्वाराने गाडीवरून केव्हा उडी मारली हे न समजल्याने बघ्यांची नजर त्याला बसच्या चाकाखाली शोधत होती. मात्र, तो किरकोळ जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसखाली आल्याने दुचाकीचे नुकसान झाले परंतु चालक बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश:वास सोडला. सुदैव इतकेच की त्याने उडी मारली त्यावेळी दुसरे वाहन तेथून जात नव्हते.