शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रूग्णालयांवरच ‘स्वाईन’चा भार

By admin | Updated: March 11, 2015 01:36 IST

औरंगाबाद, लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूने दहशत निर्माण केली असून आतापर्यंत ३० जणांचा बळी घेतला आहे

औरंगाबाद : औरंगाबाद, लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात स्वाईन फ्लूने दहशत निर्माण केली असून आतापर्यंत ३० जणांचा बळी घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य केंद्रे उघडण्यात आली असली तरी पुरेशा सुविधांअभावी औरंगाबाद जिल्ह्याचा भार ‘घाटी’वर तर इतर ठिकाणी जिल्हा रूग्णांवरच ताण पडला आहे.औरंगाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लूने जानेवारीपासून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ४६ पेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याचे तपासणी अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व महापालिका केंद्रात केवळ प्राथमिक तपासणीचेच काम होत आहे. ग्रामीण भागातील एकाही शासकीय रुग्णालयात किंवा मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचाराची सोय उपलब्ध नाही. घाटी रुग्णालयातील स्वाईन फ्लूच्या वार्डात सध्या १४ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघे पॉझिटिव्ह असून उर्वरित रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एम. गायकवाड यांनी तीन उपजिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र वार्ड केल्याचे सांगितले. ‘स्वाईन फ्लू’ने एकट्या लातूर जिल्ह्यात १३ बळी गेले आहेत. जिल्ह्यात संशयित म्हणून दाखल झालेल्या २२१ पैकी १७९ जणांचे स्वॅब पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ व्हायरालॉजी’ला पाठविण्यात आले होते. त्यातील ४९ जणांना ‘स्वाईन’ झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अद्यापतही तिघे व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात २२ संशयितांवर उपचार सुरू आहेत. तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व रुग्ण जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात येत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे़ महिनाभरात ३० जणांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतले आहेत़ सध्या जिल्हा रूग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रूग्णालयासह तुळजापूर, उमरगा व परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे़ बीडमध्ये एक रुग्ण दगावला आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूची दहशत आहे. १२ फेबु्रवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर १८ फेब्रुवारीपर्यंत ही संख्या सातपर्यंत वाढत गेली. आतापर्यंत सुमारे ५३ जणांचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४ नमुने पॉझिटिव्ह तर चार नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. (प्रतिनिधी)