महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 05:43 IST2025-02-04T05:42:31+5:302025-02-04T05:43:45+5:30
५,५८७ कोटी रुपये खर्चून १३२ स्थानकांचा ‘अमृत स्थानके’ म्हणून विकास केला जात आहे.

महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
५,५८७ कोटी रुपये खर्चून १३२ स्थानकांचा ‘अमृत स्थानके’ म्हणून विकास केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, औरंगाबाद, जालना, नागपूर आणि अजनी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरु आहे, असेही वैष्णव म्हणाले.
राज्यात २०१४ नंतर काय झाले?
२,१०५ किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले आहेत. ३,५८६ किलोमीटर रेल्वे लाईनचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. राज्यात १९ जिल्ह्यातून ११ वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
राज्यात सध्या ४७ प्रकल्पांचे काम सुरू असून त्याची एकूण लांबी ६,९८५ किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पांसाठी १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रुपये खर्च येणार आहे.
१०६२ रेल्वे उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांमध्ये २३६ लिफ्ट, ३०२ सरकते जीने आणि ५६६ स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी ही भरीव तरतूद केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो. २००९ ते २०१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी ११७१ कोटी रुपये मिळायचे, यंदा एकाच वर्षातील तरतूद ही त्यापेक्षा २० पट अधिक आहे. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री