पंढरपुरातील दोन डॉक्टरांच्या अघोरी उपचारानंतर भावाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:49 AM2020-03-11T04:49:31+5:302020-03-11T04:49:48+5:30

दारु सोडवण्यासाठी आली होती व्यक्ती ; डॉक्टरांविरुध्द दिली तक्रार

Brother dies after undergoing treatment by two doctors in Pandharpur | पंढरपुरातील दोन डॉक्टरांच्या अघोरी उपचारानंतर भावाचा मृत्यू

पंढरपुरातील दोन डॉक्टरांच्या अघोरी उपचारानंतर भावाचा मृत्यू

googlenewsNext

पंढरपूर : परवाना नसताना देखील पंढरपुरात दोन डॉक्टर रुग्णांवर औषधोपचार करतात. त्यांच्या अघोरी उपारानंतर माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. अशी तक्रार विकास पवार (रा. शिरजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी डॉ. महेश काळे व डॉ. दिपक लोखंडे (रा. सांगोला रोड, एमएसईबीच्या पाठीमागे, पंढरपूर) यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिकी हरिश्चंद्र पवार (रा. शिरजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला नातेवाईकांच्या सांगण्यावरुन दारुचे व्यसन सोडवण्यासाठी पंढरपूरमधील खाजगी डॉ. महेश काळे व डॉ. दीपक लोखंडे यांच्याकडे १८ डिसेंबर २०१८ आणण्यात आले होते. तेव्हा डॉ. काळे व डॉ. लोखंडे यांनी एका पेशंटला १ हजार ३०० रुपये सांगितले. तसेच पोट साफ करण्यासाठी ५ हजार रुपये सांगितले. ती फी नाव नोंदणी करणारे रमेश भीमराव काळे यांच्याकडे जमा केली. त्यांनतर वाल्मिकीवर औषधोपचार करण्यात आले. थोड्याच वेळात वाल्मिकीला जुलाब-उलट्या सुरु झाल्या. याबाबत दोन्ही डॉक्टरांना नातेवाईकांनी माहिती सांगितली. मात्र डॉक्टरांनी काही होणार नाही. रुग्णाला घेऊन जा असे सांगितले. वाल्मिकी यास पंढरपूरहून टेंभुर्णीमार्गे औरंगाबादला घेऊन असताना करकंब येथे दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाल्मिकीचे बोलणे बंद झाले. थोड्यावेळाने त्याचा मृत्यू झाला. याबाबत दोन्ही डॉक्टरांना फोनवरुन सांगितले. त्यावेळी त्यांनी रुग्णाला घरी घेऊन जावा असे सांगितले. वाल्मिकीच्या मृतदेहाचे गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे शवविच्छेदन करण्यात आले. गंगापूर येथे मयत दाखल करण्यात आले. तो गुन्हा पंढरपूर शहरकडे वर्ग करण्यात आला होता आहे.

छातीवर बसून उपचार
वाल्मिकी रुग्णाला डॉ. काळे व डॉ. लोखंडे यांनी प्रथम पातळ औषध प्यायला दिले. त्यानंतर वाल्मिकी याचे दोन्ही हात कापडाने बांधून त्यास जमिनीवर उताने झोपवून पायावर डॉ. लोखंडे बसले. व डॉ. काळे वाल्मिकीच्या छातीवर बसून त्याच्या नाकामध्ये औषधाचे थेंब सोडले. असल्याचा उल्लेख विकास पवार यांनी तक्रारीत केला आहे.

Web Title: Brother dies after undergoing treatment by two doctors in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर