शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 06:35 IST

बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत, काँग्रेसच्या  खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

मुंबई :  राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, महागाईचा आगडोंब उसळला आहे, हे सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे. आमचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ, महागाई नियंत्रणात आणू, तसेच प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देऊ, अशा घोषणा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केल्या. 

बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय राऊत, काँग्रेसच्या  खा. वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. “मराठी माणसाची मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला आहे. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे सुरू आहेत. मुंबईची ब्ल्यू प्रिंट नीती आयोगाला देऊन महापालिकेचे महत्त्व कमी करण्याचा डाव आहे. पण, मुंबईवर घाला घालण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा”, असा इशारा ठाकरे यांनी दिला. 

निवडणुकीच्या प्रचाराबरोबरच सोमवारी महायुतीच्या प्रचाराच्या थापासुद्धा थंडावणार आहेत. त्यांनी केलेल्या घोषणासुद्धा त्यांच्यासारख्याच फसव्या आहेत. परंतु, आम्ही जनतेला दिलेल्या वचननाम्यामधील प्रत्येक वचनामागे पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रात प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याचा आम्ही वादा केला आहे. कारण, आम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

...तर एमएमआरडीएसुद्धा रद्द करू! 

धारावी  आणि आसपासचा परिसर, मिठागरे, वीज अदानीला, बंदरे अदानीची, विमानतळ अदानीकडे,  त्यामुळे अदानीची सुलतानी आता संपवायला पाहिजे, असे यावेळी ठाकरे म्हणाले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात करार केला जात आहे. मुंबई संपवणार असाल तर आम्ही सत्तेत येताच एमएमआरडीएसुद्धा रद्द करू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

सात हजार रुपये सोयाबीनला देणार 

महायुतीच्या  सरकारने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले असून, शेतमालाला भाव मिळत नाही. आमचे सरकार असताना आम्ही सोयाबीनला साडेसहा हजार रुपये भाव दिला होता. आता पुन्हा सत्तेत येतात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. 

वाढवण, मुरबे बंदर रद्द करण्यासाठी संधी द्या!

पालघर/बोईसर : वाढवण आणि मुरबे ही बंदरे कायमची रद्द करण्याची ही शेवटची संधी असून, तुम्ही आमचे दोन उमेदवार निवडून आणा, आमचे सरकार निवडून आल्यास कोणत्याही परिस्थितीत मी ही बंदरे होऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथे प्रचारसभेत दिले. 

महाविकास आघाडीचे पालघरचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसरचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्या प्रचारासाठी ठाकरे बोईसर येथे आले होते. यावेळी त्यांनी वाढवणचा मुद्दा प्रकर्षाने मांडत यावेळी जर मशाल पेटली नाही, तर तुमच्या डोक्यावर वाढवणचा वरवंटा फिरवला जाईल, असा इशारा दिला.

पालघरमध्ये चिंतामण वनगांच्या घराचा आदर ठेवीत श्रीनिवासला निवडून आणले आणि तो तिकडे गेला. आता त्याचा वापर करून त्याला कसा फेकून दिला हे बघताच, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती