शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

मुलांची ‘टॉप नॉट’ तर मुलींची ‘स्टायलिश वेणी’, सेलिब्रेटी लूककरिता पंधरा दिवस अगोदरच अपॉइंटमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 3:15 AM

गरब्यात सेलिब्रेटींसारखा आकर्षक लूक असावा यासाठी पेहरावाबरोबर तरुणाई मेकअप आणि हेअरस्टाईलबाबत तेवढी जागरुक असते. यंदाच्या गरब्यात तरुणाईचा हेअरस्टाईलमध्ये ट्रेण्डी लूक पाहायला मिळणार आहे. मुले ‘क्वीफ’, ‘टॉप नॉट’ या हेअरस्टाईलला पसंती देत आहेत तर मुलींमध्ये ‘स्टायलीश वेणी’ची क्रेझ आहे.

प्रज्ञा म्हात्रे।ठाणे : गरब्यात सेलिब्रेटींसारखा आकर्षक लूक असावा यासाठी पेहरावाबरोबर तरुणाई मेकअप आणि हेअरस्टाईलबाबत तेवढी जागरुक असते. यंदाच्या गरब्यात तरुणाईचा हेअरस्टाईलमध्ये ट्रेण्डी लूक पाहायला मिळणार आहे. मुले ‘क्वीफ’, ‘टॉप नॉट’ या हेअरस्टाईलला पसंती देत आहेत तर मुलींमध्ये ‘स्टायलीश वेणी’ची क्रेझ आहे. या हेअरस्टाईलसाठी पार्लर्समध्ये १५ दिवस आधीच बुकिंग केल्याचे हेअर स्टायलीस्ट सांगतात.गरब्याच्या दिवसात कपडे, मेकअप, दागिने याच्याबरोबरच हेअरस्टाईलवरही भर दिला जातो. यंदा सेलिब्रेटींना कॉपी करण्याकडे तरुण-तरुणींचा कल असल्याचे हेअरस्टायलिस्ट रुशील मोरे याने सांगितले. ‘क्वीफ’, ‘शॉर्ट स्पायकी’, ‘टॉप नॉट’, ‘अंडर हेअरकट’ या हेअरस्टाईलची मुलांमध्ये चलती आहे. त्यातल्या त्यात ‘क्वीफ’ आणि ‘टॉप नॉट’ला प्रचंड मागणी आहे. ‘क्वीफ’ हेअरस्टाईलमध्ये मीडियम शॉर्ट हेअरकट ठेवले जातात. टाळूच्या भागावरच्या केसांचा पफ काढला जातो. बाऊन्सी इफेक्ट या भागातील केसांना दिला जातो आणि बाजूचेकेस शॉर्ट केले जातात. ‘शॉर्ट स्पायकी’मध्ये बाजूने लहान केस करुन टाळूच्या भागात लहान केस स्पाईक सारखे ठेवले जाते. ‘टॉपनॉट’मध्ये टाळुच्या भागावरचे केस तेवढे मोठे ठेवून त्या केसांचे नॉट बांधले जातात आणि बाजूने लहान केस ठेवले जातात.मुलींमध्ये स्टायलिश वेणीची क्रेझ आहे. यात ‘फ्रेंच ब्रेड’, ‘पिअर्स साईड ब्रेड’, ‘फिश सेल ब्रेड’, ‘डबल पोनीटेन’, ‘बॅक ब्रेड’ या प्रकारांच्या हेअरस्टाईल जास्त चालणार आहेत. मुलींची जास्तीत जास्त पसंती ‘फ्रेंच ब्रेड’ व ‘फिश सेल ब्रेड’ या हेअरस्टाईलला आहे. ‘फ्रेंच ब्रेड’ ही हेअरस्टाईल सागरवेणी सारखी असते. ‘पिअर्स साईड ब्रेड’मध्ये केसांच्या एका बाजूला पिअर्सिंग किंवा कलर एक्स्टेन्शन केले जाते. ‘फिश सेल ब्रेड’मध्ये कानाच्या पाठी सर्व केस एकत्र करुन हेअरस्टाईल केली जाते. केस जास्त दिसावे यासाठी मुली डबल पोनीटेन या हेअरस्टाईलला निवडतात. टाळुवरच्या भागात आणि केसांच्या मागच्या बाजूला पोनीटेन केले जाते. ‘बॅक ब्रेड’मध्ये छोट्या छोट्या वेण्यांच्या सहाय्याने हेअरस्टाईल केली जाते.या सर्व हेअरस्टाईल वेव्ही किंवा स्ट्रेट केस असलेल्यांसाठी आहे. परंतु ज्यांचे कुरळे केस आहे त्यांच्यासाठी ‘कर्ल्स नॉट’चा पर्याय आहे. टाळुच्या भागावर केसांचे नॉट केले जातात. या हेअरस्टाईलने एक डिसेण्ट लुक मिळतो असे रुशीलने यांगितले.>मुलांना दाढीही हवी ट्रेण्डीसध्या युनिफॉर्म बिअर्ड, टॅपर्ड बिअर्ड, थीन बिअर्ड, लाईन्स फॉर डेज, शॉर्ट बिअर्ड विथ मुस्ताच या ट्रेण्डी दाढींची चलती आहे. हेअरस्टाईलबरोबर दाढीलाही वेगळा लूक देण्याकडे तरुणाईचा कल आहे. मुलांनी एक आठवड्याआधी आणि मुलींनी १५ दिवसांआधीच हेअरस्टायलिस्टची वेळ घेतली आहे. या ट्रेण्डी लूकसाठी मुलांनी महिनाभरआधीपासूनच दाढी, केस वाढवायला सुरूवात केली आहे. सेलिब्रेटीसारखे लुक असण्याकडे मुलांचा कल आहे आणि तसाच हुबेहुब लुक देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.- रुशील मोरे, हेअरस्टायलिस्ट