शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सोशल मीडियामुळे मुलगा सापडला, पालकांकडे सुखरूप परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 00:28 IST

सोशल मीडियाचा वापर नुकसानकारक असे बोलले जाते. मात्र चांगल्या कामासाठी प्रभावीपणे वापरला तर तो अनुभव सुखदच ठरतो.

चाकण - सोशल मीडियाचा वापर नुकसानकारक असे बोलले जाते. मात्र चांगल्या कामासाठी प्रभावीपणे वापरला तर तो अनुभव सुखदच ठरतो. चाकण पोलीस ठाण्यातील कर्मचारी व पत्रकारांना आज याचे प्रत्यंतर मिळाले. खराबवाडीतून हरविलेला पाच वर्षांचा शाळकरी मुलगा पोलीस व पत्रकार यांच्या सतर्कतेमुळे व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सहकार्याने पालकांकडे सुखरूप सोपविण्यात आला.चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक वसाहत असणाऱ्या खराबवाडी (ता. खेड) येथून घरातून दुपारी एक वाजणेच्या दरम्यान धीरज रामराव साळुंखे हा पाच वर्षांचा मुलगा बाहेर खेळत असताना फिरत फिरत चाकण चौकात आला. भानावर आल्यावर त्याला आपण कोठे आलो हे समजेना. रडवेल्या अवस्थेत आलेल्या या मुलाला दोन तरुणांनी विचारपूस करून चाकण पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणा-या पत्रकारांना पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब डुबे, कोकाटे व तृप्ती गायकवाड यांनी वरील मुलगा चाकण चौकात चुकला असल्याचे सांगितले.सोशल मीडियाच्या माध्यमातून परिसरात याबाबत माहिती देऊन मुलाच्या पालकांना कळविण्याचा प्रयत्न करा, अशी विनंती केली. पत्रकारांनी मुलाचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत या बालकाच्या पालकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आम्ही मुलास घेण्यास येत आहोत, असे कळविले.पोलीस ठाण्यात आल्यानंतर धीरजने आई-बाबांना बघून त्यांच्याकडे धाव घेतली. आवश्यक कागदपत्रांची शहानिशा करून धीरजला त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक पोलीस निरीक्षक भाऊ डुबे, कोकाटे, पासलकर, महिला पोलीस शिपाई तृप्ती गायकवाड, पोलीस शिपाई खेडकर यांनी याबाबत सहकार्य केले.दिवसभर कामाचा ताण असतानासुद्धा या बालकाला त्याच्या आईवडिलांकडे देताना आपल्या चांगल्या कामाची पावती निश्चितच मिळते याचा आनंद सर्वांच्या चेह-यावर दिसत होता. 

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस