जनरेटर व्हॅनच्या धडकेत दोघे ठार
By Admin | Updated: February 9, 2015 06:13 IST2015-02-09T06:13:44+5:302015-02-09T06:13:44+5:30
ब्रेक फेल झाल्याने विक्रोळी गांधीनगर ब्रीजखालील चौकात एका जनरेटर व्हॅनने दोन दुचाकीस्वार आणि पादचा-यांना चिरडल्याची घटना रविवारी घडली

जनरेटर व्हॅनच्या धडकेत दोघे ठार
मुंबई : ब्रेक फेल झाल्याने विक्रोळी गांधीनगर ब्रीजखालील चौकात एका जनरेटर व्हॅनने दोन दुचाकीस्वार आणि पादचा-यांना चिरडल्याची घटना रविवारी घडली. यामध्ये एका दुचाकीस्वारासह पादचारी जागीच ठार झाले, तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत.
याप्रकरणी विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी व्हॅनचालक संतोष शिवकुमार यादव (२३) याला अटक केली. रविवारी दुपारी ही व्हॅन पवई येथून गांधीनगर ब्रीजमार्गे भांडुपच्या दिशेने जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला आणि त्यात दुचाकीस्वार लालचंद सहदेव गुप्ता (५९) व पादचारी प्रकाश दिनकर चव्हाण (५४) हे दोघे जागीच ठार झाले. दुचाकीचालक आकाश रवींद्र पारसा आणि संदीप दत्ताजी भोर या दोघांचा प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर ना राजावाड़ी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.