शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोघांनीही प्रतिज्ञापत्र द्या, गरज भासल्यास प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देऊ; सरन्यायाधीशांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 12:32 IST

आपलं बाजू मांडण्यासाठी दोन्ही पक्षांना २७ जुलैपर्यंतची वेळ. १ ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपाच्या मदतीने राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं. नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. असं तरी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर निर्णय झालेला नाही. दरम्यान, बुधवारी यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, यावेळी न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला आणि सध्याचं प्रकरण संवेदनशील, मोठं खंडपीठ स्थापन केलं जावं, असं निरिक्षण सर्वोच्च न्यायालयानं यावेळी नोंदवलं. दरम्यान, आमदार अपात्रबाबतची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंना आपले मुद्दे मांडण्यासाठी न्यायालयानं २७ जुलै पर्यंतची वेळ दिली आहे.

“शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात यावी. आमदारांना निलंबित करण्याचं कारण काय?,” असं युक्तीवादादरम्यान शिंदे गटाचे वकील हरीश साळवे म्हणाले. युक्तीवादादरम्यान हरिश साळवे यांनी दहाव्या सूचीचाही उल्लेख केला. एखाद्या पक्षात नेत्यानं नेतृत्व करावं असं वाटत असेल तर चुकीचं काय?, पक्ष सोडून जेव्हा दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी केली जाते तेव्हा पक्षांतर होतं. पक्षात राहता तेव्हा पक्षांतर होत नाही. आपल्या नेत्यांना प्रश्न विचारण्यासाठी आवाज उठवत असतील तर ते पक्षांतर होत नसल्याचा युक्तीवादही यावेळी त्यांनी केला. 

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या सरकारनं शपथ घेतली तर ते पक्षांतर होत नाही. २० आमदारांचाही पाठिंबा न मिळालेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपद द्यावं या कल्पनेत आहोत का अशी विचारणाही त्यांनी युक्तीवादादरम्यान केला. लक्ष्मणरेषा न ओलांडता पक्षांतर्गत आवाज उठवणे ही बंडखोरी म्हणू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मागितली आठवड्याची वेळयुक्तिवादादरम्यान काही कागदपत्र सादर करण्यासाठी आठवड्याभराची वेळ न्यायालयाकडे मागितलं. त्यावर सरन्यायाधीशांनी वेळेची समस्या नसून काही घटनात्मक मुद्द्यांचं निराकरण केलं पाहिजे असं निरिक्षण नोंदवलं. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी मी मोठ्या खंडपीठाकडे सोपण्याचा आदेश दिला नाही. यासंबंधी विचार करत असल्याचं स्पष्ट केलं. यावर सिंघवी यांनी यामुळे वेळ वाचणार असल्याचं म्हटलं. यानंतर सरन्यायाधीशांनी कोणतंही खंडपीठ स्थापन करण्याचा आदेश देत नसल्याचं म्हटलं.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र