बोरीवलीकरांकडून तिरंगा यात्रेचे आयोजन, तिन्ही सैन्य दलातील जवानांना मानवंदना

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 8, 2025 18:07 IST2025-05-08T18:06:39+5:302025-05-08T18:07:55+5:30

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली.

Borivali residents organize Tiranga Yatra, pay tribute to soldiers of all three armed forces | बोरीवलीकरांकडून तिरंगा यात्रेचे आयोजन, तिन्ही सैन्य दलातील जवानांना मानवंदना

बोरीवलीकरांकडून तिरंगा यात्रेचे आयोजन, तिन्ही सैन्य दलातील जवानांना मानवंदना

पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव गमावावा लागला. प्रत्युत्तरात भारताच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागून ती उध्वस्त केली. भारतीय जवानांनी ऑपरेशन सिदूरने प्रत्युत्तर देत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे कंबरडे मोडले.

भारतीय जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याला मानवंदना देण्यासाठी आज बोरीवली येथे स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली बोरीवलीत तिरंगा रॅली काढण्यात आली.यावेळी स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक मार्ग (राधाकृष्ण हॉटेल) ते गोरा गांधी येथील स्वामी विवेकानंद पुतळ्याशी याचा समारोप करण्यात आला. मोठ्या प्रमाणात देशभक्त नागरिक यात सामील झाले होते.

Web Title: Borivali residents organize Tiranga Yatra, pay tribute to soldiers of all three armed forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.