कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा; शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 19:11 IST2021-11-11T19:11:19+5:302021-11-11T19:11:55+5:30
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं वादग्रस्त विधान कंगानाने केलं होतं.

कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा; शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी
बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानं आनंद व्यक्त केला होता. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला . या व्हिडीओत तिने ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावले होते. तसेच तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभारदेखील मानले. कंगनाने एका मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केलं. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं कंगनाने म्हटलं आहे. यानंतर अनेकांनी तिच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. दरम्यान शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला असून तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे.
"रणौत यांनी अतिशय बेजबाबदार, निराधार, स्वातंत्र्य योध्याचे अपमान करणारे हे त्याचे विधान असून त्याचा जाहीर निषेध आहे. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असलेली त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी रणौत ही अभिनेत्री आहे," असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.
लकड़ी के घोड़े पर प्लास्टिक की तलवार लेकर वीरांगना बनने वाली सरकारी चाटुकार आजादी के सिपाहियों का अपमान कर रही है। हज़ारों कुर्बानियों के नतीजे को भीख बता रही है। pic.twitter.com/gH4JbOd4l9
— Rofl Gandhi 2.0 🚜🏹 (@RoflGandhi_) November 10, 2021
काय म्हटलंय कंगनानं?
"देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं," असं कंगनाने म्हटलं आहे.