शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या दौऱ्याआधी सोलापुरात ब्लॅक आऊट; प्रणिती शिंदेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:33 IST

पंतप्रधान मोदी उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूरचा दौरा करणार आहेत. विकासकामांच्या उद्घाटनासाठी मोदी सोलापूरला येत आहेत. या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याचा पवित्रा काँग्रेसनं घेतला आहे. मात्र प्रशासनाकडून यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदींवर सडकून टीका केली. मोदींच्या दौऱ्याआधी सोलापूरमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी आंदोलनं करण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली. मात्र काँग्रेसच्या आंदोलनांना प्रशासनानं परवानगी नाकारली. त्यामुळे काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. 'जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनं होणार आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक जण रस्त्यावर उतरणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे तेदेखील सरकारचा निषेध करणार आहेत. याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाला मिळाल्यानं दडपशाही सुरू आहे,' असा घणाघाती आरोप त्यांनी केला. उद्याचा दिवस सोलापूरकरांसाठी काळा दिवस असेल, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. 'उद्या शहरातील केबल सेवा बंद असणार आहे. मोदींच्या दौऱ्याआधी शहरात ब्लॅक आऊट करण्यात आला आहे,' असा दावा त्यांनी केला. मोदींनी देशातील जनतेची निराशा केल्याचं त्या म्हणाल्या. '2014 मध्ये लाट होती. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी जनतेला प्रचंड आश्वासनं दिली होती. त्यामुळे मतदारांना मोठी आशा होती. मात्र मोदींनी जनतेची निराशा केली. मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, हे आता लोकांना कळून चुकलं आहे,' अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPraniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपाSolapurसोलापूर