शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा काळा दिवस, डान्स बारच्या निर्णयावर आर. आर. आबांच्या लेकीचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 8:31 PM

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी न्यायालयाच्या डान्स बारवरील बंदी उठवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.

सांगली- माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी न्यायालयाच्या डान्स बारवरील बंदी उठवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या डान्स बारवरील बंदी उठवण्याचा हा निर्णय आल्यानं खूप वाईट वाटलं. महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस म्हणावा लागेल. महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र ही संतांची भूमी, त्याला वेगळा सांस्कृतिक वारसा आहे. असा सांस्कृतिक वारसा असताना डान्स बार बंदीसारख्या गोष्टींना प्रोत्साहन देणं योग्य नाही. न्यायालयाचा निर्णय ही महाराष्ट्रासाठी खेदजनक बाब आहे. 

आबांकडे गृहखातं असताना ते एखादे प्रकरण अभ्यास करून सोडवत असत. या डान्स बारमुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं आबांना समजल्यावर त्यांनी त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. काही लोकांनी सांसारिक कर्ज काढून डान्स बारमध्ये पैसे उधळले होते. तसेच डान्स बारमुळे एका महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचंही आबांनी पाहिलं होतं. तेव्हाच आबांनी महाराष्ट्रात डान्स बार बंदीचा निर्णय घेतला.डान्स बार बंदीचा निर्णय घेण्याआधी आबांनी सर्व्हे केला होता, त्या सर्व्हेत डान्स बारमध्ये नाचणाऱ्या 70 ते 80 टक्के मुली बांगलादेशी असल्याचं समोर आलं होतं. बांगलादेशी मुलींच्या उपजीविकेचं साधन महाराष्ट्रानं सरकारनं का शोधावं, असा प्रश्नही स्मिता पाटील यांनी उपस्थित केला आहे. डान्स बारसारख्या गोष्टींमुळे महाराष्ट्राची संस्कृती खराब होतेय. तसेच न्यायालयात या निर्णयाच्या बाजूनं पाठपुरावा करण्यास राज्य सरकार कमी पडल्याचंही स्मिता पाटील म्हणाल्या आहेत. कोण आहेत स्मिता पाटील ?स्मिता पाटील या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या आहेत. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी स्मिता पाटील यांचा विवाह झाला आहे. या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याचंही बोललं जातंय. आनंद यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केलं असून ते पुण्यात व्यवसाय सांभाळतात. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या स्मिता पाटील या अध्यक्षा आहेत.