राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमानाला झालेल्या भीषण अपघातात निधन झालं होतं. अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत सुरुवातीपासूनच अनेक शंका घेतल्या जात आहेत. यादरम्यान, या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स आणि रेकॉडरचं अपघातानंतर विमानाला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मोठं विधान केलं आहे. विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे. पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्याना अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्सबाबत विचारण्यात आले. तेव्हा रोहित पवार म्हणाले की, विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे. पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही. आता याच्यामध्ये काय राजकारण चाललं आहे, हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्या खोलामध्ये जावं लागेल. दरम्यान, उद्या अधिक खोलात जाऊन या घटनेवेळी काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आहेत, त्या आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांसोबत चर्चा करत होते, याचा रोहित पवार यांनी पुनरुच्चार केला. अजित पवार हे जयंत पाटील यांना नेहमी भेटायचे. गेल्या दीड वर्षांमधील सीसीटीव्ही चित्रिकरण काढून तपासा म्हणजे अजित पवार हे जयंत पाटील यांना कितीवेळा भेटले हे कळेल, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
एअर एक्सिडेंट ब्यूरोने दिली अशी माहितीदरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडला होता. मात्र आगीत हा ब्लॅक बॉक्स जास्तच जळाल्याचे सांगण्यात येत होते. विमान अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा यापद्धतीने त्याची रचना केलेली असते मात्र आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदाच या अपघाताविषयी अधिकृत निवेदन करण्यात आले आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते, ज्यात एक डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांचा समावेश आहे. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ उच्च तापमानात होते आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले. परंतु एल३-कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) AAIB फ्लाइट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला असं सांगितले आहे
Web Summary : Rohit Pawar suggests political interference in the Ajit Pawar plane crash investigation, questioning the black box's integrity despite its protective design. He hinted at revealing more details and reiterated claims of Ajit Pawar's reconciliation talks with Sharad Pawar faction.
Web Summary : रोहित पवार ने अजित पवार के विमान दुर्घटना की जांच में राजनीतिक हस्तक्षेप का आरोप लगाया, ब्लैक बॉक्स की सुरक्षा पर सवाल उठाया। उन्होंने अधिक खुलासे का संकेत दिया और शरद पवार गुट के साथ अजित पवार की सुलह वार्ता दोहराई।