शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टातही भाजपाचा विजय

By admin | Updated: December 5, 2014 03:57 IST

धडपड करून विधानसभेत आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेल्या भाजप सरकारने उच्च न्यायालयातही विजयी पताका कायम ठेवली आहे़

मुंबई : धडपड करून विधानसभेत आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेल्या भाजप सरकारने उच्च न्यायालयातही विजयी पताका कायम ठेवली आहे़ या आवाजी मतदानाविरोधातील दोन्ही याचिका न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावल्या़ त्यामुळे भाजप सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला ़भाजपच्या प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आवाजी मतदानाला काँग्रेसचे आमदार नसीम खान व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार अवस्थी यांनी स्वतंत्र याचिका दाखल करून न्यायालयात आव्हान दिले होते़ न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर याची सोमवारपासून सलग चार दिवस सुनावणी सुरू होती़ त्यात याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड़ अनिल अंतुरकर यांनी युक्तिवाद केला़ ते म्हणाले, आवाजी मतदान हे बेकायदा आहे़ याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारकडून अ‍ॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे व मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी फौजफाटा होता़ विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी नियमानुसारच आवाजी मतदानाला परवानगी दिली होती़ त्यात बहुमत सिद्ध झाले़ त्यामुळे वैयक्तिक मतदानाचा प्रश्नच उद्भवत नाही़ आणि याचिकाकर्ते हे भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा करून असून ते गैर असल्याचा युक्तिवाद अ‍ॅडव्होकेट जनरल मनोहर यांनी केला़ याचे अ‍ॅड़ अणे यांनी समर्थन केले़ अखेर विधानसभेतील मतदानासंदर्भात हस्तक्षेप करण्याचे अधिकार न्यायालयाला नसल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने या याचिका फेटाळल्या़ (प्रतिनिधी)