शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवबंधनाला भाजपाचे रक्षाबंधनाने उत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 20:10 IST

कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने २१ लाख महिलांकडून २१ लाख राख्या जमा करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देभाजपाच्या पुणे शहर शाखेच्या वतीने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वागत

पुणे: शिवसेनेच्या बहुचर्चित शिवबंधनाला अखेर भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रक्षाबंधनाचे उत्तर दिले. कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने २१ लाख महिलांकडून २१ लाख राख्या जमा करण्याचे आदेश दिले. यातून त्या महिला व त्यांच्या कुटुंबातील मतांचे गणित मांडत त्यांनी यामुळे राज्यात सत्ता येणारच अशी खात्री व्यक्त केली.भाजपाच्यापुणे शहर शाखेच्या वतीने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक २८ मध्ये पाटील यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ तसेच स्थानिक नगरसेवक व पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांमध्ये साधेपणाने राहून काम केले पाहिजे. मी अजूनही कुठेही राहू, झोपू, खाऊ शकतो. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान तसेच हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या तीन निवडणुकांमधील स्थिती अशी आहे की तिथे कसली लाट असो अथवा नसो विशिष्ट जागांच्या खाली पक्ष जातच नाही. हे तिथे भाजपा भक्कम असल्याचे चिन्ह आहे. महाराष्ट्रात फक्त विधानसभेतच नाही तर महापालिकामध्येही असेच झाले पाहिजे. रस्ते केले म्हणजे सरकार चांगले आहे असे चित्र निर्माण होते, मात्र सामान्यांची कामे केली तर त्या कुटुंबात भाजपा माझा आहे असे चित्र होते. त्यावेळी कसली लाट असली नसली तरी तो मतदार भाजपालाच मत देतो. काय करायचे हेही पाटील यांनी सांगितले. राखीपौर्णिंमा आली आहे. महिलांना सांगा मला राखी बांधता तर आपला भाऊ मुख्यमंत्री आहे, त्याच्यासाठीही एक राखी द्या. त्या महिलेला मुख्यमंत्र्यांनी कसे काम केले, काय काम केले त्याची माहिती द्या व नंतरच राखी द्या. राज्यातून अशा २१ लाख राख्या जमा झाल्या तर २१ लाख गुणिले किमान तीन याप्रमाणे तब्बल ६३ लाख मते होतात. राज्यातील मतदारांची संख्या ४ कोटी ५० लाख आहे. १ कोटी ७० लाख मते मिळाली तर राज्यात सत्ता नक्की आहे. त्यामुळे राखीपौर्णिमेला याप्रमाणे काम करा असा आदेशही पाटील यांनी दिला.पाटील यांचा सत्कार करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सभागृहात झाली होती. शहराध्यक्ष गोगावले यांनी प्रास्तविक केले. 

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस