शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

शिवसेनेशी युतीसाठी भाजपाचा पुढाकार; ‘मातोश्री’वर जाऊन चर्चा करणार

By यदू जोशी | Published: March 27, 2018 6:01 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

यदु जोशी मुंबई : आगामी लोकसभा अािण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती व्हावी, अशी भाजपाची इच्छा असून त्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे पक्षाने ठरविले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. सेनेच्या या निर्णयाचा भाजपाला फटका बसूशकतो. तसेच तेलगु देसम पक्षएनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनाही आता राज्य सरकारमधून बाहेर पडणारअशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाचे मन वळविण्याचा भाजपाचाप्रयत्न आहे. यासंदर्भात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याशी मुनगंटीवार यांनी चर्चा केली.मुनगंटीवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, भाजपा-शिवसेनायुती झाली तर लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणेच प्रचंड यश आम्हालामिळेल. तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने आम्ही पुन्हा सत्तेत येऊ,असा आमचा विश्वास आहे. त्यासाठी युती होणे आवश्यक असून उद्धव ठाकरेंना आपण लवकरच भेटणार आहोत.सूत्रांनी सांगितले की, दोन पक्षांमध्ये ज्या मुद्यांमुळे मतभेद झालेले आहेत त्या मुद्यांवर चर्चा करून दरी कमी करण्याची शिष्टाई मुनगंटीवार करतील. त्यानंतरच जागा वाटपावर चर्चा होईल. भाजपाच्या पुढाकाराला शिवसेनकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे समजते. या हालचालींकडे राजकीय विश्लेषकांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.राज्यातील सत्तेत भाजपाचावरचष्मा आहे. महत्त्वाची खाती भाजपाकडे आहेत. त्यामुळे भाजपाच्या आमदारांना जादा निधी व योजना दिल्या जातात अशी शिवसेनेची नाराजी आहे. पक्षाच्या आमदारांनी ती उद्धव ठाकरेंकडे बोलूनही दाखविली आहे.शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने ताकद वाढविणे सुरू केले आहे. शासनाच्या विविध समित्यांवर नियुक्ती करताना शिवसेनेला योग्य वाटा दिला जात नाही यावरूनही नाराजी आहे.