शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या महिला नेत्याच्या लेकीकडून श्रीरामांबाबत प्रक्षोभक विधान, बदलापूरात तणाव, गुन्हा दाखल, पक्षाने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 12:01 IST

Badlapur News: भाजपाच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने श्रीरामांबाबत प्रक्षोभक विधान करून त्याच्या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने शनिवारी बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

भाजपाच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने श्रीरामांबाबत प्रक्षोभक विधान करून त्याच्या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने शनिवारी बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनीं आक्रमर भूमिका घेतली होती. तसेच संबंधित मुलीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीला ताब्यात घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच भाजपाची पदाधिकारी असलेल्या या मुलीच्या आईकडून पक्षाने पदाचा राजीनामा घेतला आहे. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भाजपाच्या बदलापूर पूर्वमधील महिला आघाडी असलेल्या प्रतिभा जाधव यांची कन्या मृणाल जाधव हिने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं होतं. तसेच त्या रीलमध्ये श्रीरामांबाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते. हे रील व्हायरल झाल्यानंतर शनिवारी सकाळपासून बदलापूरमधील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तसेच या वक्तव्याविरोधात बदलापूर पूर्वमधील खरवई परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच रिक्षाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित मुलीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर भाजपाने मृणाल जाधव हिची आई आणि पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या प्रतिभा जाधव यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला आहे. तसेच त्यांना पक्षामधून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजपाने प्रसिद्धी पत्रकामधून दिली आहे.  दरम्यान, प्रतिभा जाधव आणि त्यांचे पती महेश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या घटनेबाबत भावनिक प्रतिक्रिया देत खेद व्यक्त केला. 

दरम्यान, भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्षांच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे, असे चित्रा वाघ यंनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Leader's Daughter's Derogatory Remarks on Ram Cause Uproar

Web Summary : A BJP leader's daughter's derogatory remarks about Shri Ram on Instagram sparked tension in Badlapur. A case was filed, and the mother resigned from her party post after protests by Hindu organizations. The BJP condemned the statements.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूरBJPभाजपा