शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर”; व्यंगचित्रातून भाजपचा सेना-राष्ट्रवादीला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 18:30 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने शरद पवार आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

मुंबई: १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी एक टीझर जारी केला होता. तसंच आता त्यांनी एक पोस्टरही जारी केले आहे. ‘हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व’ असल्याचे शिवसेनेने त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने सणसणीत टोला लगावला आहे. 

आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, तर १४ तारखेला सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असे नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझे काही तुंबलेले नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असे उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते. यानंतर आता शिवसेनेने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून, यावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. तसेच ही सभा कुठे आणि किती वाजता आयोजित करण्यात आली असून ‘यायलाच पाहिजे’ असंही  त्यावर नमूद करण्यात आलेय. यानंतर आता भाजपने शिवसेनेला टोला लगावला आहे.

उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर

भाजपने अधिकृत ट्विटर हँडलवरून शिवसेना पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून चिमटा काढला आहे. भाजपने ट्विटरवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर टीव्ही दाखवण्यात आला असून त्यावर, हिंदुत्वाचा खरा विचार ऐकण्यासाठी आलंच पाहिजे, अशी बातमी सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवार उद्धव ठाकरेंना स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर सांगत असून, त्यावर ते होय साहेब असे उत्तर देत असताना दाखवले आहे. या व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंच्या तोंडी शरद पवारांची भाषा असते असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू. २०२४ मध्ये महाविकास आघाडी परत एकदा निवडून येईल. भाजपचे सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्णपणे भंग झालेले आहे. वास्तविक शिवसेना वेगळा पक्ष आहे त्याची वेगळी विचारसरणी आहे. २०१९ मध्ये किमान-समान कार्यक्रमाच्या आधारावर आम्ही एकत्र आलो. महाविकास आघाडी सरकारला लोकांनी स्विकारले. यामुळे महाराष्ट्र पुनश्च प्रगतीपथावर आले आणि म्हणूनच भाजपच्या पोटात दुखत असल्याने वारंवार कुठल्या न कुठल्या कारणाने सरकार पडण्याची भविष्यवाणी करत आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा