शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Vidhan Sabha 2019: विदर्भात शिवसेनेच्या बाणाला भाजपची ताण, विरोधी आघाडीत पुन्हा मानापमान, वंचितला हवाय सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:19 IST

विदर्भात रंगणार थेट सामना; ७५ टक्क्यांवर जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती

- दिलीप तिखिलेनागपूर : विदर्भात गेल्या विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी ४४ म्हणजेच ७० टक्क्यांहून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी ७५ टक्क्यांहून अधिक जागा जिंकण्यासाठी रणनिती आखली आहे. शिवसेनेची युती होण्याची चिन्हे असली तरी विदर्भात शिवसेनेचा बाण किती ताणायचा हेदेखील भाजपच्याच हाती असल्याचे चित्र आहे.दुसरीकडे आघाडीत जागावाटप ठरविताना काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये गटबाजी व पक्षांतर्गतच मानापमान नाट्य सुरू झाले आहेत. लोकसभेत सपशेल अपयशी ठरलेली वंचित बहुजन आघाडी यावेळी सन्मानजनक निकाल देण्यासाठी कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत १० पैकी फक्त चंद्रपूरची जागा काँग्रेसला जिंकता आली. ९० टक्के मतदारसंघात भाजप- सेनेने आघाडी घेतली होती. शिवाय देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंत्र्यांची फौज घेऊन ताकदीने मैदानात उतरले असल्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीचा आपल्या यात्रा पूर्ण करायलाही कस लागत आहे. एकमेव आमदार असलेली राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी तर दोन अंकी आकडा गाठून मातोश्रीवर ताठ मानेने जाण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांची धडपड सुरू आहे. काँग्रेस-राष्टÑवादीकडे विदर्भात सक्षम नेतृत्वच नाही. माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे त्यांच्या मतदारसंघात अडकून पडले आहेत, तर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल सध्या कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले हे काँग्रेसला जीवदान मिळवून देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.प्रचारात मुद्दे काय?बेरोजगारी, महागाई व कर्जमाफी हे कळीचे मुद्दे विरोधक लावून धरतील. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या यात्रेतही यावरच अधिक भर देण्यात आला आहे.भाजप विकास कामांवर ही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्ग, रस्ते, यासह विविध प्रकल्प मार्गी लागले. कोट्यवधीचा निधी विदर्भाचा खेचून आणला याचे भांडवल भाजप करेल.देशात व राज्यातील सक्षम नेतृत्वाच्या बळावर भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीत पडझड सुरू आहे. सक्षम नेतृत्वाचा अभाव दिसत आहे. याचा मतदारांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. विदर्भाचा असमतोल विकास हा मुद्दा विरोधक प्रचारात आणू शकतात. 

विदर्भातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ६२भाजप-४४शिवसेना-४काँग्रेस-१०राष्ट्रवादी-१इतर-३

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस