शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

"शिववडापाव, थाळीनंतर शिवदवाखाने येणार; डॉक्टरांऐवजी कंपाऊंडर तपासणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 13:18 IST

खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या विधानाचा भाजपाकडून समाचार

मुंबई: डॉक्टरांना काय कळतंय. मी नेहमी कंपाऊंडरकडून औषध घेतो, असं विधान केल्यानं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र संजय राऊत त्यांच्या विधानावर ठाम आहेत. मी डॉक्टरांचा अपमान केलेला नाही. डॉक्टरांकडून सुरू असलेलं कार्य कौतुकास्पद असल्याचं राऊत म्हणाले. माझं विधान जागतिक आरोग्य संघटनेबद्दल होतं. मी डॉक्टरांचा अपमान होईल, असं काहीही म्हणालो नाही, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे. यावरून आता भाजपानं राऊत यांना टोला लगावला आहे.शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता येत आहेत शिव दवाखाने.. इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील, असं ट्विट करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांना टोला हाणला आहे. डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळतं. मी त्यांच्याचकडून औषधं घेतो, असं संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हटलं होतं. राऊत यांच्या विधानावर अनेकांनी टीका केली आहे.  राऊत यांच्या विधानाबद्दल डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. मार्डनं राऊत यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. मार्डनं याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे विभागानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.डॉक्टर-कंपाऊंडर विधानावरून वाद होताच संजय राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर देवदुतासारखे धावून आले. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. त्यामुळे डॉक्टरांबद्दल मला नेहमीच आदर आहे. त्यांच्या कामाचं अनेकदा सामनामधून कौतुक करण्यात आलं. त्यामुळे त्यांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही, असं राऊत म्हणाले. डॉक्टरांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा शिवसेनाच धावून आली. मी स्वत: अनेक प्रकरणात डॉक्टरांची बाजू घेऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावल्या आहेत. डॉक्टरांना मारहाण झाली तव्हा तोडफोड करणाऱ्यांना आम्हीच समजावून समेट घडवून आणला आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले.आपलीसुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे का?, राऊतांवरून मार्डच्या डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्रसंजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे, देवेंद्र फडणवीस यांची टीकाचर्चा तर होणारच... संजय राऊत, पार्थ पवार, आदित्य ठाकरे, अमृता फडणवीस ह्यांना झालंय तरी काय?

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा